शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching: गडचिंचलेत भयाण शांतता; आरोपींचा कसून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 02:38 IST

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यापासून चोर-दरोडेखोरांची अफवा पसरवली जात होती. ‘त्या’ अफवेमुळे दोन साधू व त्यांच्या कारचालकाचे हत्याकांड झाले असून आता आरोपींना शोधण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केल्याने गडचिंचले व परिसरातील गावांत आता भयाण शांतता असून सन्नाटा पसरलेला आहे.सामूहिक हत्येनंतर गडचिंचले गावात आता फक्त पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. हत्याकांडानंतर पोलिसांनी ११० जणांना अटक केली असून १०१ जणांना पोलीस कोठडी मिळालेली आहे, तर ९ अल्पवयीनांना भिवंडी कारागृहात पाठविण्यात आले आहे. जंगलात फरार झालेल्या २५० ते ३०० जणांचा पोलीस शोध घेत आहेत. गावात काही घरे बंद असून चिटपाखरूही फिरताना दिसत नाही. गावात आता भयाण शांतता पसरली आहे. दोन साधू व त्यांचे चालक यांची हत्या ही केवळ अफवेमुळे झाली आहे, असे सांगितले जात आहे. मात्र आता गावात सुरू असलेल्या धरपकडीमुळे भीतीने गावांत सन्नाटा पसरला आहे.लोकसंख्या १२५०डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे गडचिंचले हे गाव अतिदुर्गम भागातील असून दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशालगत कासा येथून २५ कि.मी. तर तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर आहे. ग्रामपंचायतीमध्ये दिवशी आणि गडचिंचले या दोन गावांचा समावेश होत असून गडचिंचले या गावाची लोकसंख्या १२५० च्या जवळपास आहे. या गावामध्ये चौकीपाडा, हेदीचापाडा, शेतपाडा, पाटीलपाडा, साठेपाडा, खडकीपाडा, भुरकुडपाडा, चोल्हेरपाडा असे एकूण आठ पाडे येतात, तर दिवशी गावात एकूण ६ पाडे येतात.

टॅग्स :Lynchingलीचिंग