शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : आज सेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:31 IST

पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालघर - पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसतर्फे हायकमांडला माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत , माजी खासदार दामू शिंगडा आणि नवा चेहरा म्हणून मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त मधुकर चौधरी या तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यातून एकाच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पत्रकार परिषदेव्दारे अथवा पत्रकाव्दारे करण्याची शक्यता आहे.शिवसेनेने वनगा कुटुंबियांना अज्ञातस्थळी ठेवले असून जोपर्यंत श्रीनिवास हे त्यांचा अर्ज दाखल करीत नाही व माघारीची मुदत उलटून जात नाही तोपर्यंत ते प्रकट होणार नाहीत अशी खबरदारी घेतल्याचे समजते. त्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख राजेशभाई शाह या त्रिमूर्तीने सगळी ताकद पणाला लावली असून फाटक व शाह हे जातीने हे संपूर्ण आॅपरेशन हॅन्डल करीत आहेत. तर एकनाथ शिंदे स्वता त्यावर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण देशाला धक्का बसेल असा राजकीय चमत्कार मतपेटीच्या माध्यमातून आम्ही २८ मे ला घडवून दाखवू असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.काँग्रेसने या पोटनिवडणूकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते त्यानुसार ११ अर्ज आले होते. माजी राज्यमंत्री रमेश बागवे आणि ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या व त्याअंती राजेंद्र गावित, दामू शिंगडा, आणि मधुकर चौधरी या तीन नावांची शिफारस केली आहे. यापैकी मधुकर चौधरी हे मुुंबई पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त होते. दोन वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले असून ते मुळचे जव्हारचे आहेत व विक्रमगडला राहतात. नवा चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांची शिफारस केली गेल्याचे समजते. दामू शिंगड हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे व वयोमानामुळे पक्ष कार्यात फारसे सक्रीय नाहीत तरीही त्यांनी उमेदवारी मागितली आहे व जो अर्ज मागेल त्याचे पक्षातील स्टॅचर लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या नावाची निवड केल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.धर्मनिरपेक्ष मते एकवटण्याचा प्रस्ताव-काळेच्राष्टÑवादीने आम्हाला या निवडणूकीत सहाकार्य करावे असे आम्ही आवाहन केले आहे. त्याला त्यांनी अनुकुलता दर्शविली आहे परंतु याबाबतचा निर्णया त्यांच्या आणि काँगे्रसच्या केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर होणार आहे. व तशी घोषणा योग्य वेळी होईल.च्डाव्यांना आम्ही असेच आवाहन केले आहे परंतु त्यांचाही केंद्रीय पातळीवर होत असतो तो होईपर्यंत दक्षता म्हणून ते कदाचीत त्यांच्या उमेदवाराला अर्ज भरायला लावतील आणि निर्णय झाल्यावर योग्य मुदतीत ते माघार घेतील. - केदार काळे, पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्षशिवसेना चमत्कार घडवेल एवढेच सांगतो तो काय, कधी,केव्हा, कसा घडेल? ते २८ तारखेला कळेल. त्याचा शुभारंभ उद्या उमेदवारीने घडेल. - रविंद्र फाटक, आमदार, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख

टॅग्स :ElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार