शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : काँग्रेसच्या गावितांना भाजपाची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:13 IST

भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन भाजपाला जोरदार धक्का दिला. तर काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना गळाला लावून भाजपाने चतुर खेळी केली. आपण काँग्रेस सोडणार नसून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या संपर्कात आहोत, असे दुपारपर्यंत सांगणाºया गावितांनी सायंकाळी भाजपात प्रवेश केला.आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना भाजपाने पालघरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मात्र पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माजी खासदार चिंतामण वनगांच्या मुलास (श्रीनिवास) उमेदवारी देताना शिवसेनेने जे काही केले तसे त्यांनी वागायला नको होते. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गावितांना विजयी करणे हीच स्व. वनगा यांना उचित श्रद्धांजली ठरेल, असे फडणवीस या वेळी म्हणाले.गावित हे पूर्वी जनता दलात होते आणि त्यांनी नंदुरबारची लोकसभा निवडणूकही लढविली होती. पुढे आजचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पक्षात ते गेले व नंतर काँग्रेसमध्ये जाऊन आमदार व राज्यमंत्री बनले. मंगळवारी ते भाजपावासी झाले.सत्य लवकरच बाहेर येईलश्रीनिवास वनगा यांची कोणी दिशाभूल केली, त्यांना कोणी खोटी माहिती दिली याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. निवडणुकीनंतर आपण त्यावर बोलू, असे मुख्यमंत्री म्हणाले. पालघरमध्ये शिवसेनेने जे काही केले त्याचा युतीवर काही परिणाम होईल का, या प्रश्नात ते म्हणाले, कशाकशावर परिणाम होतो ते पाहू.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018palgharपालघरBJPभाजपा