शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

आरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:13 IST

गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली.

पालघर - गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रचाराची धुरा वाहिली. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि पालघरचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनीही या प्रचारात सूत्रधाराची भूमिका बजावली. शिवसेनेने पैैसे वाटणाºयांना पकडून व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात जोरदार मुसंडी मारली, तर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी थातुरमातुर खुलासा करून सेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.गद्दारी, भेसळीचे रक्त, बेईमानी अशा शब्दांचा दोन्ही पक्षांनी भरपूर मारा केला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या दामू शिंगडा व बविआचे बळीराम जाधव यांचा प्रचार फारसा जाणवलाच नाही. त्यामुळे हे दोघे लढतीत आहेत की नाही, असे मतदारांना वाटत होते, अशीच स्थिती डाव्यांची पण होती. सोशल मीडियाचा मोठा वापर या प्रचारात पाहायला मिळाला. दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची दारे आयारामांसाठी उघडी करून, मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. डाव्यांचे उमेदवार किरण गहला यांचा प्रचार फारसा जाणवलाच नाही.श्रोतेच नाहीतकेंद्रीय नेतेही प्रचारासाठी कुणी आले नव्हते. आदित्यनाथ योगी, तसेच चंद्रकांत पाटील आणि राज पुरोहीत यांचा अपवाद वगळता, भाजपाचेही केंद्रीय नेते व महाराष्टÑातील मंत्री प्रचारात उतरले नाही. स्मृती ईराणी या डहाणूच्या सूनबाई म्हणून त्यांना खास प्रचारासाठी आणले, परंतु त्यांच्या सभेला श्रोतेच न जमल्याने त्यांच्या सभेचाही विशेष असा ठसा प्रचारात जाणवला नाही.पैसे वाटणाºयांविरुद्धकेवळ चॅप्टर केस दाखलडहाणू : शिवसेनेने पैसे वाटतांना पकडलेल्या १२ जणांविरुद्ध पोलिसांनी केवळ चॅप्टर केस दाखल करून त्यांना सोडून दिले. त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्यांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या अनुमतीने गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.शह आणि काटशह- शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची खेळी अचानक करून भाजपाला धोबीपछाड दिली. त्यामुळे खवळलेल्या भाजपाने काँग्रेसचा उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन कमळाच्या दावणीला बांधले. त्यामुळे काँग्रेसही खवळली, परंतु सामग्रीअभावी तिचे हात बांधले गेले होते.- वनगा यांच्या छायाचित्राचा वापर करण्यास भाजपाला मनाई करावी, अशी वनगा कुटुंबीयांची तक्रार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, यामुळेही प्रचाराची रंगत वाढली.- नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी बविआचे हितेंद्र ठाकूर यांना ‘कुत्रा’ म्हटल्याने, या परिसरात संतापाची लाट उसळली. स्वत: ठाकूर यांनीही ‘कुत्रा इमानदार असतो. मी माझ्या मतदारांप्रती इमानदार आहे,’ असा टोला मुख्यमंत्र्यांना हाणला.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूकnewsबातम्या