शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाताचे पीक दिले शेतकऱ्याने पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:51 IST

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे ...

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न केल्याच्या निषेधार्थ संतापून त्यांनी हे पीक पेटवून दिल्याची घटना घडली.

वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या परतीचा पावसाने दडी मारल्याने दाणा परिपक्व झाला नाही. पिके लाल पडून करपून गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे सोडा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही त्यामुळे त्यांनी नैराश्यापायी आपले भातपीक कृषी साहाय्यक रंजना भोईर यांच्या समोरच पेटवून देऊन संताप व्यक्त केला. या गावातील वसंत गणपत मोकाशी, योगेश मोकाशी, विनायक मोकाशी, कृष्णा मोकाशी, तुकाराम मोकाशी, विजय मोकाशी, मंगूलाल मोकाशी, नारायण लहू मोकाशी,दीपक मोकाशी, गजानन मोकाशी, दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपाद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकºयाच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातीलच ५० ते ६० टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले.

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत.अद्याप दुष्काळ घोषित नाहीतालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून विविध गावांतील शेतकºयांनी महसूल व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा,अशी मागणीे केली आहे.नायब तहसिलदार गोसावींशी संपर्क साधला असता शासनाकडून आदेश नसल्याचे सांगितले.हे शेतकरी विविध सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांचे तसेच सावकारी कर्ज घेऊन शेती करीत असतात. महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च, तसेच निसर्गाचा लहरीपणा या सर्व बाबींमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यात सरकारचेही दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग