शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य, शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 00:50 IST

कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व  अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

वसई - कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य व शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले खरे उद्दिष्ट असेल, असा संदेश वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी सर्वधर्म मैत्री प्रार्थना मेळाव्यात दिला. शनिवार वसई धर्मप्रांतात नाताळ निमित्ताने सर्वधर्ममैत्री प्रार्थना मेळाव्याचे आयोजन गिरीज येथील जीवन दर्शन केंद्रात केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व  अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यासंदर्भात आर्च बिशप यांचे सचिव फा. रिचर्ड डाबरे यांनी लोकमत माहिती दिली. 

या प्रार्थना मेळाव्यास विविध धर्माचे नेते व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं बिशप डॉ. मच्याडो यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित होती. दरम्यान, नाताळ गीतानंतर प्रार्थनेद्वारे या कार्यक्रमाची सुरवात झाली. फा. रिचर्ड डाबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. 

कोरोना महामारीच्या या कठीण काळात ऐक्य व शांतीसाठी वचनबद्दता या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या मैत्री मेळावा व परिसंवादासाठी सर्वधर्मीय व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यात आचार्य गुरुजी नागरहळी, (हिंदू) बोळींज, मौलाना सुभाण जी (इस्लाम),मूर्ताजा भाई अमिल साब (बोरा समुदाय), मनिनदर सिंघ कोहली (शीख समुदाय), श्रीमती वैशाली जोशी, शिक्षक (स्वाध्याय परिवार), भारती ताई (ब्रम्हकुमारी), माजी आम.डॉमिनिक घोन्सालवीस प्रा. गुणवंत गडबडे (बौद्ध परिवार), प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते उपस्थित होते.

किंबहुना कोरोंनापासून संपूर्ण जगाचे संरक्षण व्हावे, जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत उपस्थितांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :ChristmasनाताळVasai Virarवसई विरार