भव्य ग्राहक बाजारपेठेचे आजपासून आयोजन

By Admin | Updated: October 14, 2016 06:07 IST2016-10-14T06:07:39+5:302016-10-14T06:07:39+5:30

देवी वाघेश्वरी महिला बचत गट व सुहासिनी महिला बचत गट यांच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या निमीत्ताने भव्य ग्राहक बाजारपेठेचे आयोजन

Organized from today's grand customer market | भव्य ग्राहक बाजारपेठेचे आजपासून आयोजन

भव्य ग्राहक बाजारपेठेचे आजपासून आयोजन

वसई : देवी वाघेश्वरी महिला बचत गट व सुहासिनी महिला बचत गट यांच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या निमीत्ताने भव्य ग्राहक बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनी मंदिर फूलारे, वाघोली येथे ग्राहक बाजारपेठेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १४ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सामवेदी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष मा.श्री. बबनशेट नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या दिवाळी बाजारपेठेत विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू , ड्रेस मटेरीयल, इमिटेशन ज्वेलरी, लेदर बॅग्ज, पेंटिंग, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ, आकर्षक कंदील तसेच दिवाळी सणासाठी लागणाया फराळासाठी आगाऊ बूकींगचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
योग्य दरात चांगल्या वस्तू ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावी म्हणून या भव्य ग्राहक बाजारपेठ भरविण्यात आली असून नागरीकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती महिला बचत गटातर्फे करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Organized from today's grand customer market