शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मीरा भाईंदर महापालिकेच्या वादग्रस्त बीएसयुपी योजनेच्या चौकशीचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 14:41 IST

Mira Bhayander Municipal Corporation : ११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे तीन इमारतींचे बांधकामातून ९६० झोपडपट्टीवासियांना दोन वर्षात घरे बांधून मिळणार होती .

मीरारोड -  गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या काशिमीरा भागातील झोपडपट्टीवासियांना पक्की घरे देण्याच्या वादग्रस्त बीएसयुपी योजनेची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

बीएसयुपी योजनेंतर्गत महापालिकेने २००९ साली काशीचर्च झोपडपट्टी मधील ४७१ आणि जनता नगर झोपडपट्टीतील ४१३६ झोपडपट्टी धारकांना इमारतींमध्ये पक्की घरे देण्याचा ठराव केला होता.  त्यावेळी खर्चाच्या ५० टक्के रक्कम केंद्र सरकार, ३० टक्के रक्कम राज्य  सरकार व ११ टक्के लाभार्थी आणि ९ टक्के महापालिकेने खर्च करायचा होता. त्यातील २१६० घरं पाडून त्यातील रहिवाशांना पालिकेने संक्रमण शिबिरात पाठवले. परंतु विविध कारणं आणि पालिकेचा भोंगळ कारभार यामुळे सदर योजना बारगळली. त्यातही केंद्रात भाजपा सत्तेत आल्यावर मोदी सरकारने योजनाच बंद केली. जेणे करून बेघर लोकांना घरं मिळण्याचा प्रश्न गंभीर बनला. 

पहिल्या टप्प्यातील केवळ १७९ जणांनाच घरं मिळाली आहेत. तर १०२१ सदनिकांच्या चार इमारतीची कामे अजून सुरु यातील २९४ सदनिका डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. पालिकेने योजना पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज मागितले असून त्यातील ४० कोटी पालिकेकडे वर्ग झाले आहेत. सदर योजनेतील इमारत क्रमांक ४, ५ व ७ च्या बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवली आहे. 

११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे तीन इमारतींचे बांधकामातून ९६० झोपडपट्टीवासियांना दोन वर्षात घरे बांधून मिळणार होती . सदर निविदा मंजुरी साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १६ मार्च २०२० रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला होता.  तिन्ही इमारतीची कामे सर्वात कमी दर भरणाऱ्या मे. शायोना कॉर्पोरेशनला देण्याची प्रशासनाची शिफारस असताना सत्ताधारी भाजपाने सदर निविदा फेटाळून लावली होती. सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून नवीन निविदा काढा असा निर्णय भाजपाने घेतला होता. परंतु अवघ्या ३ महिन्यांनी सत्ताधारी भाजपाचे अर्थपूर्ण मत परिवर्तन झाले आणि स्थायी समिती मध्ये त्याच ठेकेदारास इमारतींच्या बांधकामांची निविदा मंजूर केली गेली.  

या प्रकरणी  आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी करून सदर योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार केली. योजनेत भाजपाचेच आजी - माजी नगरसेवक व त्यांची नातलग मंडळी असल्याचे सरनाईकानी तक्रारीत दिले होते. सरकारचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी या बीएसयूपी योजने प्रकरणी चौकशीचे आदेश काढून ती जबाबदारी कोकण विभागीय आयुक्तां कडे चौकशी साठी सोपवली आहे. 

कोकण आयुक्तांनी एका महिन्याच्या आत या योजनेची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्राया सह अहवाल सादर करावा असे निर्देश आहेत. महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांना देखील या प्रकरणातील सर्व कागदपत्रे कोकण विभागीय आयुक्तांना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाला ८ सिमेंट रस्त्याच्या चौकशी सह बीएसयुपी योजनेच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची नामुष्की ओढवली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर