पालघर : वाढवण बंदरासह वडोदरा एक्सप्रेस हायवे, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग आदी प्रकल्प स्थानिक मच्छीमार,आदिवासी,स्थानिक भूमिपुत्रांना उध्वस्त करणारे असून हे प्रकल्प लादणाऱ्या सामर्थशाली सरकारविरु द्ध तितकेच मजबूत आंदोलन उभे करण्याचा निर्णय शुक्रवारी पालघर येथे मच्छीमार समाज हॉल येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने वाढवणं बंदराविरु द्धचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेतानाच जेएनपीटी मार्फत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत उत्तन ते झाइ पर्यंतच्या मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्षसमिती तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृतीसमिती व नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सराकारच्या भूमिकेवर आसूड ओढण्यात आला.प्रारंभी संघर्षसमितीच्यावतीने वैभव वझे व नारायण पाटील यांनी वाढवण बंदरामुळे मच्छीमार, डायमेकिंग व्यावसायिक व बागायतदार यांच्यावर होणारे परिणाम तसेच या विरोधात आजवर दिलेल्या लढ्याची माहिती दिली. भूमिसेनेचे काळुराम धोदडे यांनी शेतकरी, आदिवासी, मच्छीमार यांना उध्वस्त करणाऱ्या या विविध प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरून सरकारला हे प्रकल्प रद्द करायला भाग पाडायला लागेल. सर्व मच्छिमारांनी विरोधाची मुठ मजबूत करावी. त्यासाठी भक्कम एकजुटीची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे रामकृष्ण तांडेल, सुभाष तामोरे, डॉ.सुनील पऱ्हाड, शशी सोनावणे, दि.के.राऊत व शेतकरी संघर्षसमितीचे संतोष पावडे आदींनीही हा लढा व्यापक करण्याची आवश्यकता बोलून दाखिवली. नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे नरेंद्र पाटील यांनी वाढवणं बंदराविरु द्ध सर्व मच्छीमार एकजुटीने उभा राहील अशी गवाही दिली. (प्रतिनिधी)मासेमारी व्यवसायावर फिरणार नांगर- बैठकीत ५ हजार एकर समुद्र हटवून समुद्रात भराव टाकण्याच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या भरावामुळे या भागातील गावांवर मोठे संकट कोसळेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. - या बंदरामुळे कोणीही विस्थापित होणार नाही असा दावा केला जात असताना १४० मीटर इतक्या रु ंदीच्या दोन रस्त्यांमुळे या भागातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनींवर नांगर फिरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. - या भरावामुळे माशांचे प्रजनन केंद्रच नष्ट होणार असून भविष्यात मासेमारी संपुष्ठात येईल. त्याचबरोबरीने बंदराकरिता उभारले जाणारे २८ फ्लॅट(प्लॅटफॉर्म) व बंदरात दाखल होण्यासाठी बंदराबाहेर थांबलेली मोठमोठी जहाजे यामुळे मच्छीमार बोटींना त्या भागात शिरनेही अशक्य बनेल अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आलीय.
विरोधही तितकाच मजबूत
By admin | Updated: April 15, 2017 03:14 IST