शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटल बंद ठेवणाऱ्या खाजगी डॉक्टरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:57 IST

हॉस्पिटल बंद ठेवणा-या एका डॉक्टरवर आता गुन्हा दाखल झाला आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी व वसई-विरार महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील डॉक्टर्सना त्यांचे खाजगी दवाखाने, रुग्णालये चालू ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. काहींना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. मात्र नोटीसला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल बंद ठेवणाºया एका डॉक्टरवर आता गुन्हा दाखल झाला आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.डॉ. प्रवीण कुमार हे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून वसई रोड येथील नवघर-माणिकपूर शहरातील दत्तात्रय शॉपिंग सेंटर, पार्वती टॉकीजजवळ हे हॉस्पिटल-क्लिनिक आहे. नोटीस बजावूनही महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल उघडे न ठेवणाºया डॉ. प्रवीण कुमार यांच्याविरुद्ध पालिकेचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी फिर्याद दाखल करून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेच्या ‘एच’ प्रभागातील खाजगी हॉस्पिटल व दवाखाने बंद असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यासंदर्भात सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखान्यांना पालिका कार्यालयाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले, परंतु डॉ. प्रवीण कुमार यांनी त्यांचे खाजगी हॉस्पिटल ३१ मार्चपासूनच बंदच ठेवले आहे. यामुळे पालिकेच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पालिकेच्या नवघर विभागीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात डॉ. प्रवीण कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.>वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ‘कोविड’व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी नागरिकांना डॉक्टरकडे जावे लागते. मात्र, त्या सेवा खाजगी डॉक्टरांनी बंद केल्या आहेत. प्रशासनाने नोटिसा देऊनही बंद दवाखाने डॉक्टर मंडळी उघडत नाहीत, ही बाब गंभीर असून याची तक्रार आपण नवनियुक्त आयुक्त गंगाधरन देवराजन यांच्याकडे केल्यावर त्यांनी सर्व प्रभाग समिती सहायक आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची तसेच दवाखाने व हॉस्पिटल न उघडणाºया डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, असे आदेशच दिले आहेत. यातूनच ही कारवाई झाली आहे.- मिलिंद चव्हाण, उपशहरप्रमुख, शिवसेना वसई रोड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस