शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता मिळणार पुनर्वापरयोग्य सॅनिटरी नॅपकिन; शिक्षक सेनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:13 IST

आठ तालुक्यांतील ६१९ शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश

डहाणू: पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तालुक्यांतील ६१९ शाळांमधील ३५ हजार ३६९ विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी आणि पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध केले जाणार आहेत. शिक्षक सेनेच्या माध्यमातून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव जाणवतो. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने मुली याबाबत उदासीन असतात. बहुतांश विद्यार्थिनी मासिक पाळीमुळे शालेय वर्षातील सुमारे ५० ते ६० दिवस अनुपस्थित राहतात.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बहुसंख्य विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनबाबत माहिती असली, तरी आर्थिक बाबतीत या गोष्टी परवडणाऱ्या नसल्याने त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शिक्षक सेना पुढे सरसावली आहे. याअंतर्गत विद्यार्थिनींना आरोग्य सल्ला दिला जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी, पॅड वापरण्यासाठी जनजागृती आदी मार्गदर्शन स्त्री - रोग तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. तसेच वर्षभरासाठी या नॅपकिनचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे.

शिक्षक सेना पॅडमनच्या भूमिकेत : प्रशासकीय परवानगीसाठी पत्र

सॅनिटरी नॅपकिन या विषयाचे महत्त्व आणि वापर याबाबत पॅडमॅन या सिनेमात जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना हे नॅपकिन वापराचे महत्त्व समजावून देऊन, ते विनामूल्य उपलब्ध करणे आणि वापरासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षक सेनेने पुढाकार घेत पॅडमॅनची भूमिका वठवली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती निलेश गंधे, माजी शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी या मोहिमेत विशेष लक्ष घातले आहे. सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविण्याकरिता प्रशासकीय बाबीची परवानगी मिळविण्यात शिक्षणाधिकारी सानप यांनीही परवानगी पत्र दिले आहे.

या सॅनिटरी नॅपिकनचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे कॉटनच्या कापडापासून बनवलेले असल्याने वापरानंतर स्वच्छ धुवून, सुकवून वर्षभर वापरणे सहज शक्य आहे. ते पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आहे. ग्रामीण व शहरी भागातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळून शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होईल व आर्थिक बचतही होईल.- अ‍ॅड. डी.आर. लोंढे, अध्यक्ष, उत्कर्ष ग्लोबल फौंडेशन

आदिवासी भागात नेहमीच दुर्लक्षित असलेला मात्र किशोरवयीन विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम शिक्षक सेनेच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.- विठ्ठल ठाणगे, अध्यक्ष,शिक्षक सेना डहाणू

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी