शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE  बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव 

By धीरज परब | Updated: November 30, 2023 19:01 IST

मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. शाळेची ५ मजली इमारत तयार असून महापालिकेची सीबीएसई  बोर्डची शाळा पुढील वर्षापासून सुरु होणार असून सामान्य व गरीब घरातील मुलांना सुद्धा आता सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिकता येणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. 

भाईंदर पूर्वेच्या  इंद्रलोक येथे आरक्षण क्रमांक ११५ मध्ये विकासकाकडून विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यात तळ अधिक ५ मजल्याची शाळा इमारत बांधून मिळाली आहे  . सर्व सामान्य घरातील कष्टकरी गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार इंग्रजी भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी  त्याठिकाणी सीबीएसई बोर्डची शाळा सुरु करण्याची मागणी आ. सरनाईक यांनी चालवली होती . त्यासाठी शिक्षण मंत्री व महापालिके कडे पाठपुरावा चालवला होता. 

महापालिकेने २९ नोव्हेम्बर रोजी सीबीएसई बोर्डची शाळा पुढील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरु व्हावी यासाठी नोंदणीकृत व अनुभवी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. महापालिका ही शाळा चालविण्यासाठी शाळा इमारत , वीज व पाणी पुरवठा करेल. तर  सर्व शिक्षक व व्यवस्थापनाचा खर्च , शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा तयार करणे, फर्निचर , डिजिटल बोर्ड , लॅब आणि सर्व आवश्यक सुविधा या संस्थेने करायच्या आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्थांनी महापालिकेकडे स्वारस्य प्रस्ताव १४ डिसेंबर पर्यंत पाठवायचे आहेत. नवी मुंबई महापालिकेची सीबीएसई बोर्डची शाळा चालविणारी संस्था भाईंदरची सदर शाळा इमारत पाहून गेली आहे. शाळा चालवायला घेईल ती संस्था दर्जेदार शिक्षण देणारी आणि सामाजिक भान जपणारी जवी अशी अपेक्षा यावेळी आ. सरनाईक यांनी बोलून दाखवली. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरSchoolशाळाpratap sarnaikप्रताप सरनाईक