शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:05 AM

भाजपा बनली भाडोत्री : आॅक्सिजनअभावी मृत झालेल्या बालकांचे शाप घेऊन योगी आदित्यनाथ आलेत

वसई : श्रीनिवास वनगा हा वनगा नसून वणवा आहे, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपेक्षेतून भडकलेला हा वणवा भाजपाला पराभूत करण्यास कारणीभूत ठरेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत केली.मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा सांगतांना ते म्हणाले की, त्यांनी स्वत:च सांगितले की आम्ही काही महिन्यांपूर्वीच गावितांशी पालघरच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली होती. म्हणजे गद्दार कोण झाले? आधी पोटनिवडणूक मग लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणूका होणार असतांना एवढ्या आधी तुम्ही गावितांशी संधान साधले होते.तिकडे भाजपाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी बोलाविले. म्हणे मार्गदर्शन करण्यासाठी बोलविले. कसले मार्गदर्शन. भाजपाच्या उमेदवारांना पराभूत कसे करावे याचे मार्गदर्शन. यांचा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिंल्ला असताना व हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना तिथल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव होतो. याचा अर्थ काय?हे योगी त्यांच्या राज्यात आॅक्सिजनअभावी मरण पावलेल्या चिमुकल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शाप घेऊन आलेले आहेत. साधा आॅक्सिजन तुम्ही त्यांना देऊ शकला नाहीत. तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा सवाल त्यांनी केला. भाजपा ही भाडोत्री झाली आहे. सभेला श्रोते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, वक्ते भाडोत्री असा सारा प्रकार आहे.वनगांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावितांना विजयी करा, असे भाजपा म्हणते. गावित विजयी झाले तर वनगांच्या आत्म्याला शांती लाभेल असे सांगते.मग त्यांचाच पुत्र जर या निवडणुकीत विजयी झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही? त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही? काहितरी बोलायचे म्हणून बोलतात.मोदी आणि भाजप सतत सांगतात देश बदल रहा है। खर आहे. मोदीजींसाठी देश बदल रहा है। कारण आज रशिया, उद्या अमेरिका, परवा चीन नंतर जपान अरे पण कधीतरी भारतात रहा. जनतेचे प्रश्न सोडवा, अशी खवचट त्यांनी केली. या वसईत दहशत माजवली जाते. परंतु मी सांगतो छत्रपती शिवरायांच्या या महाराष्टÑात कुणाचीही दहशत चालणार नाही. मोडून काढू, इथे फक्त शिवरायांचा दराराच चालेल.या मुख्यमंत्र्यांच्या काळात घोषणाग्रस्त किंवा आश्वासनग्रस्त असा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. तोंड भरून घोषणा करतात, आश्वासन देतात पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.मीठागरांचा प्रश्न, विकास आराखड्याचा प्रश्न, सूर्याचे पाणी वाटपाचा प्रश्न, शहर बस वाहतुकीचा प्रश्न कायम ठेवणाऱ्या भाजपा आणि त्याच्या सरकारविरुद्ध आता जनतेनेच उठाव करावा आणि या निवडणुकीत पराभव करून त्याला धडा शिकवावा, असा आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री थापाडेकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत साडे सहा हजार कोटी देण्याचे आश्वासन दिले. साडे सहा रुपये दिले नाही, असे हे थापाडे आहेत. वसई महापालिकेतील गावे वगळायची, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गावे वगळायची एवढे साधे प्रश्न या मुख्यमंत्र्यांना सोडवता येत नाही. ते काय कामाचे? व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत पण मुख्यमंत्री म्हणून निष्क्रिय आहेत, असे तेम्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018