शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:52 IST

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही.

नालासोपारा - लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्या असल्या तरी वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे परिवहन सेवा बंद असल्याने मागील पाच महिन्यांपासून दोन हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. सेवा बंद असल्याने आर्थिक परिस्थितीचे कारण देत ठेकेदार कर्मचाºयांना पगार देत नाही आणि कर्मचाºयांना दुसरीकडे नोकरीही मिळत नाही. त्यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्न या कर्मचाºयांना पडला आहे. एस.टी. महामंडळ कर्मचाºयांना अर्धा पगार देत आहे, मग परिवहन ठेकेदार का देत नाही, असा सवाल या कर्मचाºयांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये एस.टी. काही प्रमाणात तर मुंबईतही बेस्ट सुरू होती. आम्हीही काम करायला तयार आहोत, मात्र ठेकेदारच बससेवा सुरू करत नसल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे. तर आयुक्तांशी पगाराबाबत बोलणी सुरू आहे, असे कारणदेत ठेकेदाराने ऐनवेळी हात वरकेल्याने कर्मचाºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.बस नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल1परिवहन सेवेतील कर्मचाºयांवर पगाराविना आर्थिक संकट ओढवले असताना बस नसल्याने शहरातील सामान्य नागरिकांचेही हाल होत आहेत. वसई-विरार शहरांचे जनजीवन आता पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. दुकाने, बाजारपेठा तसेच वसई पूर्वेला असलेल्या औद्योगिक कंपन्याही सुरू झाल्या आहेत.2मात्र, या ठिकाणी जाण्याची सोय कामगारांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेकडो कर्मचारी दररोज ८ ते १० किलोमीटर पायपीट करत कंपनीत पोहोचतात. त्यामुळे शहरांतर्गत बस सुरू करावी, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांनी केली आहे.अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या ३५ ते ४० कर्मचाºयांचा पगार देण्यात आला आहे व जे कामावर नाहीत, त्यांना पगार देण्यात आलेला नाही. मनपा परिवहन सेवा सुरू करण्यास सांगते आहे. पण, पैशांचे काहीही बोलत नाही किंवा हमी देत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या आधारे ५० टक्के प्रवासी कमी झाल्यावर डिझेलचा खर्चही सुटणार नाही. पगाराबाबत आयुक्तांकडे आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच काही निर्णय येईल.- मनोहर सकपाळ, संचालक, मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट प्रा.लि.ठेकेदाराचा कर्मचाºयांच्या पगाराबाबत महानगरपालिकेशी कोणताही संबंध नाही. ठेकेदार कर्मचाºयांच्या पगारासाठी जबाबदार असतो. कंत्राटदाराने गरिबांना पैसे द्यावे. मागेही या कामगारांनी पगार मिळाला नाही म्हणून संपाचे हत्यार उपसले होते. त्या वेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कंत्राटदाराला स्पष्ट ताकीद दिली होती की, कर्मचाºयांचे पगार तुम्ही द्यायचे. ते जर आमच्या कार्यालयात आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल.-विश्वनाथ तळेकर, प्रभारी सहायक आयुक्त,वसई-विरार माहापालिकाआम्हाला पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. काम नाही आणि खर्च होत आहे. बसेसही सुरू होत नाहीत. दुसरे कामदेखील करू शकत नाही. किमान घर चालविण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत दिली पाहिजे.- सोमनाथ गायकवाड, बसचालक,परिवहन सेवा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस