शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी डोल्हारा होणार टॅँकरमुक्त; ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:22 IST

पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.२०१२ या वर्षी भिषण पाणी टंचाईमुळे डोल्हारा येथील पार्वती जाधव या आदिवासी महिलेला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने १ कोटी ५६ लाख रु पये अंदाज पत्रकीय रक्कमेच्या पाझर तलावाच्या कामाला मंजुरी दिली होती.त्वरीत स्थानिक आमदार व खासदारांच्या हस्ते उद्घाटन करून २०१२ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. परंतु कागदपत्रांच्या पुर्ततेत व वारंवार कामात झालेला फेरबदल यामुळे या साठवण तलावाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षे रखडले होते.परंतु या कामाच्या सुधारित संकल्प चित्रानुुुसार डिजाईन काँक्र ीट हायग्रेट केला जाणार असल्याने यासाठी ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या तलावाची व्याप्ती १३ हेक्टर च्या आसपास पाणी साठा होणार असूूून मे २०१८ अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यामुुुळे पुढच्या वर्षी डोल्हारा गाव टँकर मुक्त व पाणी टंचाई मुक्त होईल अशी अशा आहे.गाव उंचावर असल्याने तीव्र टंचाईडोल्हारा गावची लोकसंख्या १४६० एवढी असून हे गाव उंच टेकडीवर वसलेले आहे. तसेच विहीरीचे अंतरही खुप दुरवर आह.े उन्हाळ्यात विहीर तळ गाठत असल्याने टँकरच्या पाण्याने डोल्हारा वासियांना तहान भागवावी लागते. येथील पाण्याचा प्रश्नही अतिशय गंभीर आहे. यामुळे २०१२ मध्ये पार्वती जाधव या महिलेला घोटभर पाण्यासाठी आटापिटा करत असताना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी