शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पानेरी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:04 IST

पानेरी नदीच्या प्रदूषणाची गंभीरता दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषण करणाऱ्या कंपन्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलने करूनही कारवाई होत नाहीत.

- हितेन नाईक पालघर : पानेरी नदीच्याप्रदूषणाची गंभीरता दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषण करणाऱ्या कंपन्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलने करूनही कारवाई होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर रोजी बोलाविलेल्या सर्वसंबंधितांच्या बैठकीस तहसीलदारांनीच दांडी मारल्याने ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.हजारो बागायतदार आणि मच्छीमारांच्या आर्थिक स्तोत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी पानेरी नदी पालघर नगर परिषद आणि काही कारखान्यांतून होणाºया प्रदूषणामुळे काळवंडली आहे. मागील ८-१० वर्षांपूर्वी पानेरी वाचविण्याची हाक देत वडराई, माहीम मधील हजारो स्थानिक नागरिकांनी पानेरी वाचवा संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण ही केले होते. त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधींसह तत्कालीन अधिकाºयांनी दिलेल्या लिखित आश्वासनांची पूर्तता अद्यापही झालेली नाही मात्र नगरपरिषदेच्या गटारगंगेसह काही कारखानदारांनी आपले प्रदूषित पाण्याचे पाइप थेट नदी-नाल्यात सोडायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कुठल्याही विभागाची परवानगी न घेता काही कारखानदारांनी बेकायदेशीररित्या कंपनी उभारून तिचे प्रदूषित पाणी सरळ पानेरी नदीत सोडून प्रदूषण करीत आहेत. त्याचे पुरावे सादर करून कारवाई करण्याची मागणी वर्षभरा पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली होती. मात्र या बाबातचा अर्ज खालच्या कार्यालयात इकडून तिकडे आजही फिरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्याचे इतर विभाग प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत काणाडोळा करीत असल्याचे स्पष्ट होते आहे. या प्रदूषणाचे दिवसेंदिवस वाढत असून पालघर नगर परिषदेचे सांडपाणी आणि बिडको औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतील प्रदूषित, रासायनिक सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता छोट्या नाल्यात, पानेरी नदी मध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे या नदीच्या आजूबाजूला राहणाºया गाव पाड्यातील लोकांना नानाविध त्वचा रोग, दमा, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांची लागण झालेली आहे. तर हे प्रदूषित पाणी वडराई च्या खाडीतून थेट समुद्रात जात असल्याने खाडीतील माशांसोबतच तेथील जैव विविधता नष्ट होऊ लागली आहे.ह्या गंभीर बाबींची दखल तक्रारी आणि आंदोलने करूनही घेतली जात नसल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोरे ह्यांनी ५ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने तहसीलदारांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मायक्रोबार, तुरखीया टेक्स्टाईल, आॅस्टिनिक स्टील, वेलस्पन, शिवा पेट्रोझन्सि, सॅफेक्स फायर सर्व्हिस, निशांत अरोमॅक्स, ड्युरीअन, गोल्डन सर्जिकल, हिंदुस्थान लॅबोटरीज, जयश्री केमिकल कंपन्यांना शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी कागदपत्रांसह बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. तालुकाध्यक्ष मोरे, कंपनी प्रतिनिधी, आदी अधिकारी बैठकीसाठी असतांना तहसीलदार नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याने शिवसेना संतप्त आहे.बहाडोली आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने अचानक कारवाईसाठी जावे लागले.पानेरी संदर्भात तात्काळ ह्या आठवड्यात बैठक घेऊन उपाय योजना आखू.- महेश सागर, तहसीलदार,

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदी