शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

कासटवाडी ते कशिवली घाट बनलाय अपघातांचा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:33 AM

- हुसेन मेमन जव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता ...

- हुसेन मेमनजव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता झाल्याचे दिसते आहे. गेल्या आणि यंदाच्या पावसाळ्यात येथे २६ हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू तर ७० हून अधिक वाहन चालक आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे झाल्याचे समोर आले आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.कासटवाडी रस्ता ते कशिवली घाट येथे पावसाळ्यात जास्त अपघात घडतात. कासटवाडी गावाजवळील ३ किमी.चा रस्ता हा निसरडा झाल्याने पावसाळ्यात चालकांनी ब्रेक मारले तरीही वाहनाचा टायर सरकून अपघात घडल्याचे येथील नागरिक आणि काही चालकांनी सांगितले.जव्हार - कासटवाडी - कशिवली हा मुंबई ठाणे, कल्याण, डहाणू, पालघरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. दोन वर्षापूर्वी हा रस्ता जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. बांधकाम विभाग सांगते हा रस्ता महामार्गाकडे गेला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग सांगते, अजूनही हा रस्ता आमच्याकडे आलेला नाही. तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.कासटवाडी गावाजवळील रस्त्यावर गेल्यावर्षी देखील पावसाळ्यात अपघातांचे छत्र सुरू होते. मात्र त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी आणि प्रसिद्धी माध्यामांनी हा रस्त्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने यात लक्ष घालते. ३ किमी.च्या या रस्त्यावर पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले.मात्र तरीही हे अपघातांचे सत्र सुरूच आहे. येथील नागरिकांना याबाबत माहिती असल्याने ते सावकाशपणे गाडी चालवतात. मात्र, नव्याने येणाऱ्यांना येथून खूप सांभाळून जावे लागते. या वाहनचालकांना याची माहिती नसल्याने हे अपघात घडत आहेत.कासटवाडी ते कशिवली घाट हा नागमोडी वळणाचा असून, घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंती तुटल्याने हा रस्ता खचत चालला आहे. असे असतानाही या घाटातील संरक्षक भिंती बांधण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.२५ ते ३० वर्षांपूर्वी या रस्त्यावर काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या तर काही ठिकाणी दगड रचून दगडी बांध म्हणजेच संरक्षण कठडा बांधण्यात आला होता. मात्र, आजमितीस या संरक्षक भिंती आणि दगडी बांध तुटले असून हा घाट अत्यंत धोकादायक बनला आहे.जव्हारहून मुंबई - ठाणे - कल्याण - पालघरकडे म्हणजेच जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रोजच शेकडो वाहने ये - जा करतात. रोजच जाणाºया वाहनचालकांना यामुळे काही फरक पडत नाही. हा अरुंद रस्ता, त्यातच नागमोडी वळणे, तुटलेले संरक्षण कठडे त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून जाताना मोठी कसरत करावी लागते.त्यातच जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने या घाटातील रस्त्यावरून पावसाळ्यात रोजच शेकडो पर्यटक येतात. मात्र घाटात रस्ता तुटल्यामुळे पर्यटकांना, नवीन वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.हा रस्ता आमच्या विभागाकडे हँडओव्हर झालेला नाही. याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. - निलेश महाजन,उपअभियंता, राष्ट्रीय महामार्गहा रस्ता आमच्या विभागाकडे येत नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हँडओव्हर झाला आहे.- डी.जी. होले,उपअभियंता सा.बां. विभाग, जव्हार.जव्हार ते कासटवाडी, कशिवली घाट हा मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याच्या मुद्द्यावरून बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक इतरांचे बळी जात आहेत. यामुळे कोणीतरी जबाबदारी स्वीकारून रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करावी.- सुनील भुसारा , राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार