शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nalasopara: गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 21:03 IST

Nalasopara Crime News: २९ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह बंद घरात सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. सदर हत्या झालेल्या महिलेच्या एका पायाचे दोन तुकडे झाल्याचेही सूत्रांकडून कळते.

 - मंगेश कराळेनालासोपारा - २९ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह बंद घरात सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. सदर हत्या झालेल्या महिलेच्या एका पायाचे दोन तुकडे झाल्याचेही सूत्रांकडून कळते. तुळींज पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या कोणी व का केली याचा तपास आता पोलीस करत आहे.

शहरातील नागिनदास पाडा येथील दत्त निवास चाळीतील घराच्या मालकाला बंद खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यानंतर त्यांनी संशयावरून तत्काळ तुळींज पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता एक महिला रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसून आली. सप्तशीला सावंत (२९) असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. परंतु मृतदेहाची स्थिती अशी होती की ओळख पटवणे कठीण होते. ही महिला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सूत्रांकडून कळते. ज्या घरात मृतदेह आढळून आला ते घर फेब्रुवारी महिन्यात एका महिलेला भाड्याने देण्यात आल्याची माहिती घरमालकांकडून देण्यात आली. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी