शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

आता नालासोपारा नायजेरियनांचा अड्डा; पोलिसांच्या दप्तरी मात्र खूपच कमी नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 06:50 IST

तुळींज येथे १३ आणि नालासोपारा येथे फक्त २ असे बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियन नागरिकांची पोलिस ठाण्यात नोंद आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा : नालासोपारा शहराच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात नायजेरियन नागरिकांचा जणू अड्डाच बनला आहे. नायजेरियन नागरिकांच्या गँग शहरात फसवणूक, लॉटरी स्कीम, कोट्यवधी रुपयांचे बक्षीस लागल्याचे मेसेज, असे अनेक गैरधंदे बिनधास्त करीत असतात. तसेच अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीमध्ये यांचा सहभाग असल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून, आजवर कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. 

नालासोपारा परिसरातील आचोळेगाव, अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवालनगर, प्रगतीनगर, रेहमतनगर, हनुमाननगर या परिसरात मोठ्या प्रमाणात ते अनधिकृतपणे राहतात. मात्र तुळींज येथे १३ आणि नालासोपारा येथे फक्त २ असे बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियन नागरिकांची पोलिस ठाण्यात नोंद आहे.

तुळींज आणि नालासोपारा पोलिस ठाण्यांतर्गत अंदाजे दीड ते दोन हजार नायजेरियन नागरिक राहत असल्याचे कळते. पोलिस प्रशासन वेळीच कारवाई करीत नसल्यामुळे नायजेरियनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. मीरा-भाईंदर, मुंबई, नवी मुंबई येथील नायजेरियन नागरिक राहण्यासाठी नालासोपारा शहर गाठतात. पोलिसांनी जर वेळीच कडक कारवाई केली नाही, तर भविष्यात हे नागरिक डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नायजेरियनांनी थाटले अनधिकृत बारप्रगतीनगर परिसरात नायजेरियनांनी ४ ते ५ अनधिकृत बार थाटले आहेत. तुळींज पोलिसांनी मागे या बारवर कारवाई करून ते फोडले होते. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथून शेकडो नायजेरियन येऊन एकत्र रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावून पार्ट्या करतात. या परिसरातील काही इमारतींमधील अनेक सदनिकांत नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. 

भारतीय महिलांशी विवाहकाही नायजेरियनांनी अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी विवाह केले आहेत, तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री येथे राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे. काहींनी अमली पदार्थांचे गुन्हे दाखल होऊन अटक झाल्यावर सुटल्यानंतर नालासोपाऱ्यात बस्तान बसविले आहे.

दोन महिन्यांपूर्वी एका नायजेरियनकडून एक कोटीचे अमली पदार्थ पकडले होते. अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. काही नायजेरियनांकडे आधार कार्ड व कागदपत्रे असल्याने कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पासपोर्ट, व्हिसा नसल्यावर त्यांच्यावर  गुन्हा दाखल केला जातो. - अमर मराठे, पोलिस निरीक्षक, नार्कोटिक्स सेल

टॅग्स :Drugsअमली पदार्थ