शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बायकोवर वाईट नजर; पतीने केला मित्राचा मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 07:02 IST

वालीवमधील घटना; दगडाने ठेचून हत्या

- मंगेश कराळेनालासोपारा : एकाच कंपनीत काम करणाऱ्या जिवलग मित्राने आपल्या मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवल्याने अखेर दारूच्या नशेत पतीने डोक्यात व तोंडावर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना २० मार्चच्या मध्यरात्री वालीवच्या खैरपाडा परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.वालीव पोलिसांना हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. हत्या झालेल्याची ओळख पटवून आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर होते. मयताचे फोटो सर्वत्र व्हायरल करून त्याची ओळख पटविण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीमने संपूर्ण परिसर पिंजून काढला. माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या मदतीने मयताची ओळख पटली आणि हत्येच्या आरोपीला अटक करून २४ तासांच्या आत उलगडा करण्यात वालीव पोलिसांना यश मिळाले. वालीव येथील धुमाळ नगरमध्ये असलेल्या पॉलिश करण्याच्या कंपनीमध्ये मयत रामकरण वर्मा (४२) आणि आरोपी अरमान इरफान शेख (३५) एकत्र कामाला होते. हे दोघेही जिवलग मित्र होते. रामकरण याच्याकडे आरोपीच्या पत्नीचे अनेक अश्लील फोटोज होते व त्याची आरोपीच्या बायकोवर वाईट नजर होती. यालाच कंटाळून आरोपीने पत्नीला गावाला नेऊन सोडले होते. हाच राग मनात ठेवून २१ मार्चला रविवारी रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपीने रामकरण याला स्वतःच्या दुचाकीवर बसवून खैरपाडा येथील मोकळ्या जागेत घेऊन गेला. दोघांनी येथे बसून अतिदारू पिल्याने मद्यधुंद झाले होते. मृताने आरोपीला त्याच्या पत्नीच्या बाबतीत काही बोलला आणि याच कारणावरून भांडणाला सुरुवात झाली. हे भांडण इतके झाले की, दोघांमध्ये हातापाई झाली. दोघांनी आपापल्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले. आरोपीने मयताला जमिनीवर पाडल्यावर बाजूला असलेल्या दगडाने सहा ते सात वेळा डोक्यात जोरात मारून त्याची निर्घृणपणे हत्या केली. नंतर आरोपीने मोठा दगड उचलून मयताच्या तोंडावर टाकून पळून गेला. दगडामुळे मयताच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाल्याने ओळख पटवण्यास पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. २४ तासांच्या आत गुन्हा उलगडलाआजूबाजूच्या कंपनीत, परिसरात मृताचे फोटो घेऊन पोलीस याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते. याच परिसरातील माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्याशी पोलिसांनी संपर्क करून मदतीसाठी आवाहन केले. यालाच प्रतिसाद देऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने भोवतालच्या सर्व कंपनीत मृताचे फोटोज फिरवले आणि ओळख पटण्याचा धागा वालीव पोलिसांना मिळाला. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी राहत असलेल्या घरातून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने २४ तासांच्या आत पकडून हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पत्नीवर वाईट नजर आणि तिचे काही फोटोज मृताकडे असल्याने पतीने दगड डोक्यात घालून हत्या केल्याचे उघड झाले, असे वालीवचे व.पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.