शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Nalasopara: त्यांचा मृत्यू हा मारहाण व ढकल्यामुळेच, रिजाय यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 18:48 IST

Crime News: धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

- मंगेश कराळे नालासोपारा - धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

नालासोपाऱ्याच्या धानिवबाग येथील परशुराम चाळीत राहणारा रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची फिर्याद मृत रियाजची बहिण नुरजहा खान हिने गुरुवारी पेल्हार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वसईत खळबळ माजली होती. पोलिसांनी त्या तक्रारीवरून पत्नी, तिचा प्रियकर व इतर सात ते आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा तीन, पेल्हार आणि तुळींज पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू केला. यातील काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करत गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी घटना घडलेले ठिकाण शोधून त्याठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळवल्याने या गुन्ह्याचा गुंता सोडविण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेने त्यांच्या ताब्यातील लोकांना तपासासाठी व सीसीटीव्ही फुटेज पेल्हार पोलिसांच्या स्वाधिन केले. पेल्हार पोलिसांनी सर्वांचे जाबजवाब, सीसीटीव्ही फुटेज व एका १० वर्षाचा साक्षीदार मुलाच्या महितीनंतर आरोपी जितेंद्रने केलेल्या मारहाणीमूळे व त्याच्या ढकल्याने रिजाय यांचा मृत्यू झाला आहे.

नेमकी काय होती घटनारिजाय अली मुन्सी राजा (५५) हे अनुज, विनीत, जितेंद्र, टेलर व अन्य ओळखीच्या लोकांसोबत २१ ऑगस्टला कळंब समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. येताना वाटेत नाळा गावातील परिसरात टेंपोत रिजाय आणि जितेंद्र या दोघांचे आपसात भांडण झाले. जितेंद्रने रियाज यांना टेंपोतून उतरून मारहाण केली व ढकलले. रियाज यांना ढकल्याने नाल्यात पडले व डोक्यात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व इतर जणांच्या जबानीनंतर मारहाण व ढकलल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचनामा, गुन्ह्याचे इतर कागदपत्रे व घटनास्थळ नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तपास व चौकशीसाठी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.- वसंत लब्दे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार