शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मीरा-भाईंदर महापालिकेने मालकीचे भूखंड विकायला काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:39 IST

आजच्या महासभेत प्रस्ताव, सर्वांचे लागले लक्ष

मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील ३३४ पैकी अवघी १०६ आरक्षणेच विकसित केलेली असताना उर्वरित २२८ आरक्षणे नागरिक तसेच शहराच्या हितासाठी विकसित करण्याऐवजी सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या मालकीच्या आरक्षणाच्या जागाच विकायला काढल्या आहेत. दोन आरक्षणांच्या जागाविक्रीचे, तर उद्यानाच्या आरक्षणातून हॉटेलसाठी जागा कमी करण्याचा तर एका लॉजसाठी हरितपट्टा रद्द करण्याचे प्रस्तावच महापौरांनी उद्याच्या महासभेत आणले आहेत.मीरा रोडच्या कनकिया येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान हे पाच हजार चौ.मी.चे आरक्षण क्र. २५२ आहे. या आरक्षणापैकी निम्मे म्हणजेच दोन हजार १५० चौ.मी. इतके क्षेत्र पालिकेच्या मालकीचे आहे. पालिकेच्या मालकीची जागा लल्लन तिवारी यांच्या राहुल एज्युकेशन सोसायटीला विकण्याचा प्रस्ताव आहे. दुसरा प्रस्ताव आरक्षण क्र. ३२८ खेळाचे मैदान व प्राथमिक शाळेचा आहे. नऊ हजार ७६७ चौ.मी. क्षेत्र असून त्यातील महापालिकेच्या मालकीची एक हजार ३६१ चौ.मी. इतकी जागा आहे. तर सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीकडे आरक्षणातील सात हजार ५२६ चौ.मी. इतकी जागा आहे. त्यामुळे पालिकेच्या मालकीची जागा या संस्थेला विकण्याचा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव हा मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्कजवळील उद्यानाच्या आरक्षण क्र. ३०५ मधून एका हॉटेलसाठी मोक्याची दर्शनी जागा कमी करण्याचा आहे.हरितपट्टा रद्द करण्याचा प्रस्ताव : उत्तनच्या धावगी मार्गावर मौजे डोंगरी येथील या जागा हरितपट्टयात आहेत. या जागा डी-१ झोनमध्ये असल्याने ०.३ चटईक्षेत्र अधिक प्रीमियम ०.२ असे ०.५ चटईक्षेत्र वापरता येते. परंतु, जागामालक शुभारंभ रिसॉर्ट यांनी सर्व जमीन डी-२ या झोनमध्ये बदलण्याची मागणी सरकारकडे केली होती. झोन बदलासाठी महापालिकेने सर्व प्रक्रिया पार पाडून सादर केल्यास गुणवत्तेवर निर्णय घेईल, असे नगरविकास विभागाने कळवले होते. वाढीव चटई क्षेत्र मिळवण्यासाठी हरितपट्टा रद्द करण्याचा घाट घातला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक