लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा रोड रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतरही ते पुन्हा तेथे ठाण मांडतात. तसेच जवळच्याच नयानगर परिसरात बेकायदा आठवडाबाजार भरवला जात असल्याने त्यावर प्रभाग समिती-५ चे अधिकारी व नयानगर पोलिसांनी शनिवारी कारवाई करून आठवडाबाजार बंद केलाआणि रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त केला.रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करा, अशी मागणी सतत होत असतानाही मीरा रोड रेल्वेस्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान नित्याची बाब झाली आहे. यावर अनेक राजकीय पक्षांनी कारवाईची मागणी करून प्रसंगी गांधीगिरीही केली. त्यानंतर, पालिकेने त्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. काही काळापुरता रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्याचा प्रकार सुरू झाला. अखेर, शनिवारी प्रभाग समिती-५ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण व नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पंधारे यांनी कारवाई करून रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवले. तसेच जवळच्या नयानगर परिसरात असलेल्या अस्मिता सुपर मार्केट येथील अरुंद रस्त्यावर काही स्थानिक गुंडांकडून परस्पर दरशनिवारी आठवडाबाजार भरवला जात होता. या बाजारात ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांकडून मिळणाºया हप्त्यांपोटी त्याचा विस्तार राजरोसपणे केला जात होता. यात बाजारकराचा महसूल वाढत असल्याने कंत्राटदाराचेही चांगभले होत होते. त्यामुळे मुजोर फेरीवाले तेथील इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच ठाण मांडू लागल्याने इमारतीतील रहिवाशांना येजा करण्यात अडचण निर्माण होत होती. त्याची तक्रार केल्यास धमकीही दिली जात होती. दादागिरीच्या भीतीपोटी तेथील रहिवासी पालिकेकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. अखेर, त्रासाचा कहर झाल्याने कंटाळलेल्या रहिवाशांनी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्याकडे व्यथा मांडली. त्याची दखल घेत हुसेन यांनी पालिकेच्या प्रभाग समिती-५ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करून बेकायदा भरवला जाणारा आठवडाबाजार त्वरित हटवण्याची सूचना केली. तसेच काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सारा अक्रम यांनीदेखील प्रभाग अधिकाºयांसह नयानगर पोलिसांमध्ये बेकायदा फेरीवाल्यांचा आठवडाबाजार बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार, प्रभाग अधिकाºयांसह फेरीवाला कारवाई पथक व नयानगर पोलिसांनी शनिवारी आठवडाबाजारावर कारवाई करून तो बंद पाडला.कारवाईला काही विक्रेत्यांचा विरोधकाही फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. अखेर, पालिकेसह पोलिसांनी तेथील गुंडगिरी मोडीत काढून आठवडाबाजार तूर्तास बंद करून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. यावेळी नगरसेविका सारा अक्रम जातीने उपस्थित होत्या.
पालिका, पोलिसांनी फेरीवाल्यांवर केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:13 IST