शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आयुक्त व आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:12 IST

वसई विरार महापालिकेवर सद्या दि.28 जून 2020 रोजी मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात  आला असल्याने यावेळी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही असा गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गांला पडला आहे. 

वसई विरार शहर महापालिकेतील कर्मचारी वर्गाला यावर्षी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या वसई विरार महानगरपालिका अधिकारी - कर्मचारी संघटनेने दिवाळी पूर्वी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान मिळावे याकरिता बविआ अध्यक्ष तथा वसईचे आम.हितेंद्र ठाकूर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी  याना साकडे घातले आहे.

 

वसई विरार महापालिकेवर सद्या दि.28 जून 2020 रोजी मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात  आला असल्याने यावेळी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही असा गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गांला पडला आहे. 

त्यातच कोरोनाचे संक्रमण किंबहुना ते कमीही होत आहे व  दिवाळी सण ही तोंडावर आला असताना कोरोनाच्या काळात पालिका कर्मचारी वर्गानी दिवस रात्र काम केले असून त्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि कर्मचार्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे या मागणी साठी गुरुवारी वसई विरार महानगरपालिका अधिकारी- कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी . व  वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या दोघांनाही या मागणी बाबतचे निवेदन सादर केलेयाप्रसंगी सानुग्रह अनुदान बाबतीत ला  हा प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले आहे.  लोकप्रतिनिधींच्या काळात कर्मचार्यांना अनुदान व्यवस्थित पणे मिळत होते. त्यामुळे यावेळीही हे अनुदान मिळावे अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

दरम्यान  या कर्मचारी वर्गातील शिष्टमंडळात अध्यक्ष सुधाकर संखे ,संजू पाटील खजिनदार स्मिता भोईर ,मेरी डाबरे, कल्पेश पाटील, उमेश म्हसणेकर  होता. 

 

यावेळी आम. हितेंद्र ठाकूर यांनी  कोरोनाच्या काळात कर्मचार्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आपण या प्रश्नात नक्कीच लक्ष घालू असे ही  सांगितले तर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी हि कर्मचार्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात चांगले व उत्तम काम केले असून त्यांना इतर महापालिका प्रमाणेच अनुदान देण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केली असल्याचे स्पष्ट केलं.

त्यामुळे आता आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी 

कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान बाबतीत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार