शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई उच्च न्यायालयाची वादग्रस्त जाहिरात ठेक्याला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:18 IST

मनपाला दणका : प्रकरणाला वेगळे वळण

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेने दिलेल्या वादग्रस्त जाहिरात फलकांचा कर वसूल करणाऱ्या खाजगी जाहिरात कंपनीच्या ठेका प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. यापूर्वी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्र्यांनी ‘जैसे थे’ आदेश दिला होता तसेच आता मुंबई उच्च न्यायालयानेही जाहिरात निविदेच्या ठेक्याला स्थगिती आदेश दिल्याची माहिती वसई-विरार जाहिरात असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी सुभाष गोंधळे यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई-विरार महापालिकेने मुंबईस्थित मे. वेगास नामक जाहिरात कंपनीला मागील वर्षी हा ठेका दिला होता. सुरुवातीला महापालिकेतील विरोधी गटातील शिवसेना व भाजप नगरसेवकानी पालिकेचे उत्पन्न अधिक असताना व मागील दोन वर्षांपासून जाहिरात कर गोळा न करता कुठलेही सर्वेक्षण न करता तो हेतुपुरस्सर बुडवून कागदावर कमी दाखवून हा ठेका अत्यंत कवडीमोल दराने दिल्याच्या कारणावरून या वादग्रस्त प्रकरणाला मंत्रालयात आव्हान दिले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली होती आणि या वादग्रस्त जाहिरात ठेक्याला पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ आदेश दिला होता.आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील या जाहिरात ठेकाप्रकरणी वसई-विरार महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून आता पुन्हा या ‘जैसे थे’ प्रकारामुळे पालिका अजूनही वसई विरारमधील कुठल्याही जाहिरात आस्थापनाकडून जाहिरात कर घेत नसल्याने पालिकेचेच आजवर कोट्यवधी रुपयांचे नुकसान मागील दोन ते तीन वर्षांपासून असेच सुरू आहे. वसई-विरार शहरातील हजारो बेकायदा फलकांमुळे शहरांचे विद्रुपीकरण सातत्याने सुरूच आहे. त्यातही वसई-विरार महापालिकेचे जाहिरात धोरण पालिकेला १० वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही मंजूर होत नाही. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून जाहिरात फलकांच्या करापोटी एकही रु पयांचे उत्पन्न पालिकेला मिळालेले नाही. अशा जाहिरात फलकांकडून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते. मात्र पालिकेने मागील वर्षी मे.वेगास नामक कंपनीला सहा वर्षासाठी वार्षिक अवघ्या ४० लाख रुपयांचा ठेका मंजूर केला. या प्रकरणी पालिका सभागृहातही पडसाद उमटल्यावर हा ठेका वादाच्या भोवºयात सापडला होता.सर्वेक्षण न करताच ठेका?पालिकेने २०१३ पर्यंतच वसई-विरार शहरातील जाहिरात आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्याआधारे हा ठेका दिला आहे.च्२०१८ मध्ये ठेका देताना पालिकेने पुढील चार वर्षे शहरातील फलकाचे सर्वेक्षण का केले नाही? असा सवाल केला जात आहे.