शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Mumbai Ahmedabad Bullet Train : 'बुलेट ट्रेनला विरोध करायचा झाल्यास तो आम्हीच करू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:28 IST

Mumbai Ahmedabad Bullet Train : डहाणू ग्राम पंचायतीत ठराव मंजूर

- महेश चेमटे

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम 8 स्थानके असलेल्या गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. 508 किमी लांबीच्या बुलेट मार्गात महाराष्ट्रातील 246.42 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. बुलेट ट्रेनवरून सुरू असलेल्या संभ्रमावस्थेमुळे बुलेट ट्रेनला विरोध करायचा झाल्यास तो फक्त गावकरी करतील, विरोधासाठी कोणत्याही परप्रांतीयाला गावात विरोध करण्यासाठी प्रवेश करू देणार नसल्याचा ठराव डहाणू, पालघर, तलासरी येथील ग्राम पंचायतीने मंजूर केला आहे. 

ठाणे जिल्यातील पालघर तहसील क्षेत्रातील विरातन खुर्द येथील गावकऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यावर भू संपादनासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवली आहे. गावात रुग्णालय, शाळा आणि पाण्याच्या समस्या प्राथमिकतेणे पुरवाव्यात अशी भूमिका या गावकार्यानी मांडली. या नुसार रेल्वे कंटेनरमध्ये रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शनिवारी, 1 सप्टेंबर रोजी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण होणार आहे. 

राज्यात पालघर येथील 73 गावांमधील 221 हेक्तर जमिन बुलेट प्रकल्पामुळे बाधित होणार आहे.  बुलेट ट्रेनला विरोध करायचा झाल्यास तो फक्त गावकरी मिळून करतील, यासाठी अन्य गावातील रहिवाशांचा किंबहुना परप्रांतीयांना यात दखल देता येणार नाही, असा ठराव संमत करून घेतल्याचे डहाणू येथील आसवे ग्रामस्थानी सांगितले.

बाधित गावकरी आणि स्थानिकांशी चर्चा केली असता प्रकल्पासाठी जमीन देण्याबाबत त्यांनी नाराजी दर्शवली. जमीन दिल्यानंतर ही आमच्या मागण्या आणि समस्या 'जैसे थे' आहेत यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे गावातील जुने सरपंच कार्यालयाचे रुग्णालयात नूतनीकरण करण्यात येत आहे. याठिकाणी MBBS दर्जाचे डॉक्टर आणि पुरुष व महिला रुग्णसेविकांची नियुक्ती करणार असल्याचे हाय स्पीड कॉर्पोरेशन प्रवक्ता धनंजय कुमार यांनी सांगितले. 

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात येथील 8 स्थानकासाठी अहमदाबाद ते वलसाड मार्गावरील एकूण 196 गावातील 966 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी 6.64 हेक्टर जमीन ही वनविभागाच्या अखत्यारीत असून 124 हेकटर जमीन रेल्वेची आहे. उर्वरित 753 हेक्टर जमीन खासगी मालकीची आणि 89 हेक्टर जमीन गुजरात राज्य सरकारच्या मालकीची आहे. गुजरात मधील 194 गावांना सेक्शन 11 नुसार नोटीस बजावण्यात आल्या असून या मुळे तूर्तास तरी या गावातील जमीन धारकांना बुलेट प्रकल्प वगळता अन्य व्यवहार करता येणार नाही, अशी माहिती हाय स्पीड कॉर्पोरेशन च्या अधिकृत सूत्रांनी दिली.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनGujaratगुजरात