शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमएससीआयटीला पुणे विद्यापीठाच्या कोर्सचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:49 IST

सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे एमएससीआयटी व सीसीसी या संगणक कोर्स आता पुणे विद्यापिठाच्या गर्व्हमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसीक कोर्स (जी.सी.सी.-टि.बी.सी.)चा पर्याय उपलब्ध असणार आहे.

- हुसेन मेमनजव्हार : सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे एमएससीआयटी व सीसीसी या संगणक कोर्स आता पुणे विद्यापिठाच्या गर्व्हमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसीक कोर्स (जी.सी.सी.-टि.बी.सी.)चा पर्याय उपलब्ध असणार आहे. या कोर्सला शासन निर्णयात समाविष्ट करण्याचा निर्णय १६ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयात करण्यात आला आहे.राज्यातील संगणक व टायपिंग च्या शासनमान्य संस्थाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे व पदाधिकाऱ्यांनी यासाठी आंदोलन केले होते. कोर्स बाबतच्या या धोरणात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एमएससीआयटीचे बंधन नसेल. पूर्वी जी.सी.सी.-टि.बी.सी. कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयामधील ८६ कोर्स व दिनांक ८ जानेवारी २०१८ मधील २ कोर्स अशा ८८ कोर्स पैकी एक कोर्स करावा लागत होता.या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत सुरु करण्यात आलेल्या गव्हर्मेंट सर्टिफिकेट ईन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ३०, ४० श.प्र.मि. या सहा महिने कालावधीच्या अभ्यासक्रमास संगणक अर्हता परीक्षा म्हणून शासन अद्यादेश प्राप्त झाला आहे.दरम्यान, शासनाच्या जाहिरातीमध्ये अजूनही एमएससीआयटी या कोर्सची मागणी अनिवार्य म्हणून करण्यात येते या बाबत आश्चर्च व्यक्त होत आहे.कुशल विद्यार्थी आणि शासकीय सेवेमध्ये निपुण कर्मचारी घडविण्याच्या दृष्टीने टंकलेखनचे कौशल्य आणि संगणक तंत्रज्ञानाचा वापर होईल अशा प्रकारे जी.सी.सी.-टि.बी.सी. या कोर्सचा सिलॅबस व परीक्षा पद्धतीची रचना केलेली आहे.- समिर म्हात्रे, म.रा.ट.ल.सं.संस्था,राज्य सदस्य

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र