शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन शिक्षकांचे आंदोलन, वाडा पंचायत समिती कार्यालयात मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 23:46 IST

वाडा तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले

वाडा - तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून तेथेच चूल मांडून जेवण शिजविण्यात आले.शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य व कार्यानुभव या विषयांकरिता अंशकालीन निर्देशक नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वाडा तालुक्यात २८ शिक्षक कार्यरत असून वर्ष २०१६ पासून या शिक्षकांना अल्प मानधन मिळाल्याने शिक्षकांचा प्रवासखर्चही भागत नाही अशी तक्र ार या शिक्षकांची आहे.जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार मानधन देणे बंधनकारक असताना वाडा तालुक्यातील अंशकालीन शिक्षकांना मात्र तासिका पध्दतीचे निकष लावून गेल्या तीन वर्षात अल्प मानधन दिल्याने या शिक्षकांवर अन्याय झाल्याने शिक्षकांच्या या मानधनाच्या प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.१०) या शिक्षकांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. तसेच मानधन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु च राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजिवी संघटनेचे नेते रूपेश डोळे, किशोर मढवी, मनोज काशिद हे करीत आहेत. या आंदोलनात श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अंशकालीन शिक्षक प्रतिनिधी रेखा पराड, मोनिका वलटे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.अंशकालीन शिक्षक म्हणून अल्प मानधनावर आम्ही काम करत असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात दरमहा ५ हजार मानधन दिले असताना आमच्यावरच अन्याय का? यावर्षी वर्षभराचे अवघे १५ हजार मानधन काढलेय. त्याने आमचे भाडेही वसूल होत नाही. जीआर आम्हालाच लागू आहे का? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.- शिल्पा पाटील, अंशकालीन शिक्षिका अंशकालीन शिक्षकांना प्रतितासिका ५० रुपयांप्रमाणे महिन्याला शंभर तासिका झाल्यास ५ हजार रु पये मानधन देण्याची तरतूद आहे. जिल्हा स्तरावरून आलेल्या सूचनाप्रमाणे तासिकांप्रमाणे मानधन काढण्यात आले आहे. हे मानधन तासिका पद्धतीने मुख्याध्यापकांमार्फत अदा केले जाते. शिक्षकांच्या मागणीचा विचार करु.- विजय बाराथे, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, वाडा

टॅग्स :Teacherशिक्षकVasai Virarवसई विरार