शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दिव्यांगांच्या आमदार निधीवरून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन

By धीरज परब | Updated: July 15, 2024 19:44 IST

आमदार जैन यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन; दिव्यांगांची फसवणूक करून राजकीय हेतूने स्टंटबाजी केल्याचा भाजपा दिव्यांग सेलचा आरोप 

मीरारोड - आमदारांच्या माध्यमातून खर्च होणाऱ्या दिव्यांग निधीचा वापर किती दिवसात करणार याचे लेखी पत्र द्या अशी मागणी करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आमदार गीता जैन यांच्या कार्यालय बाहेर अचानक आंदोलन केले. यावेळी आ. जैन सह आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केले गेले. तर आमदारांचा दिव्यांग साठीचा निधी नुकताच मंजूर झाला असून त्यासाठी राजकीय संघटनेला पत्र देण्याचा प्रश्नच येत नाही. दिव्यांगांची फसवणूक करून राजकीय हेतूने प्रहार ने आंदोलन केल्याचा आरोप भाजपच्या दिव्यांग सेल ने केला आहे. 

आमदारांना शासना कडून येणाऱ्या निधीतील दिव्यांगांसाठी पूर्वी १० लाखांच्या खर्चाची मर्यादा होती. ती वाढवून ३० लाखांची केले गेली आहे. आमदारांच्या शिफारशीनुसार गरजू दिव्यांगांना आवश्यक साहित्य आदींचे वाटप केले जाते. त्याच्या खरेदी खर्चाची मंजूर जिल्हाधिकारी यांच्या कडून होते. दरम्यान सोमवारी प्रहार दिव्यांग संस्थेच्या मीरा भाईंदर अध्यक्षा काजल नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या काही दिव्यांग कार्यकर्त्यांनी न्यू गोल्डन नेस्ट येथील आमदार गीता जैन यांच्या कार्यालय बाहेर जमून आंदोलन केले व घोषणा दिल्या. 

आमदारांनी दिव्यांगांचा निधी वापरण्या बद्दल १५ दिवसांच्या मुदतीची तारीख टाकून पत्र द्यावे.   आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडून पण पत्र घेऊन राहणार अन्यथा त्यांच्या कार्यालय बाहेरपण आंदोलन करणार असा इशारा काजल नाईक यांनी दिला. ह्या आधी दोन्ही आमदारां विरुद्ध आंदोलन केले पण ते आंदोलनात भेटायला आले नाही. एका दिव्यांगाचे घर तुटले. आ . जैन व सरनाईक यांनी घर तुटले म्हणून प्रत्येकी १०-१० हजार मदत करावी पण त्यांचे उत्तर नाही. आमदारांच्या पीए ना वेळोवेळी सांगून व पत्र देऊन देखील दुर्लक्ष केले गेले असे नाईक म्हणाल्या. 

दरम्यान भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष संजय सुरवसे यांनी सांगितले की, दोन्ही आमदारांच्या विरोधातील एका नेत्याच्या इशाऱ्यावरून आणि सदर दोन्ही आमदारांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हि स्टंटबाजी केली गेली आहे. आमदार निधीच्या खर्चाचे पत्र स्वतःच्या नावाने मिळवण्याचा अट्टहास आणि त्यासाठी दिव्यांगांची दिशाभूल करून त्यांना वेठीस धरून आंदोलन करणे चुकीचे आहे. 

आमदार गीता जैन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुक आचार संहिता मुळे रखडलेल्या दिव्यांग निधीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यातून गरजू दिव्यांगांना साहित्य दिले जाणार असून त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोणा राजकीय संघटनेच्या व्यक्तीच्या नावाने आमदार निधीचे पत्र कसे देणार? आपण त्यावेळी कार्यालयात नसताना मुद्दम आंदोलन केले गेले. दिव्यांगांना कार्यालयात येऊन बसा सांगितले तसेच चहा - नाश्ता सुद्धा विचारला होता. 

टॅग्स :mira roadमीरा रोडBJPभाजपाMLAआमदार