शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:42 IST

भारतातील हिमाचल प्रदेशामधील "चंद्रभागा शिखर" वसईच्या चार गिर्यारोहकांपैकी दोघांकडूनच सर करण्यात आले आहे. दि.15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास केला.

आशिष राणे

वसई -  वसईतील गिरीकन्या म्हणून सर्वांना सुपरिचित असलेली वसई मांडलई स्थित हर्षांली वर्तक आणि विरार चे  नितीन गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील 6 हजार 18 मीटर उंचीवरील सर्वात कठिण असे चंद्रभागा- 14 हे  शिखर नुकतेच सर करण्यात  यश मिळवले आहे. या एकुणच मोहिमेत वसईतील चार जण सहभागी झाले होते मात्र कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या दोघांना ही मोहीम अर्धवट सोडून दयावी लागली होती तर देशभरातील विविध भागातून आलेल्या एकूण 12 गिर्यारोहकांचा यात सहभाग होता. तर खास करून कोरोनाच्या संक्रमण काळात तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही अत्यंत कठीण अशी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून दोनच दिवसांपूर्वी आम्ही सर्वं वसईत परतलो असल्याची माहिती वसईतील गिर्यारोहक नितिन गांधी यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे. 

या मोहिमे विषयी अधिक माहिती देतांना गांधी म्हणाले की,हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा- 14 ही खडतर मोहीम फारच अवघड होती,तर मागील तीन वर्षांत चंद्रभागा-14  च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट, अवघड चढण यामुळे फिरकला देखील नव्हता. मात्र इंडियन माऊंटनिंग फाऊंडेशनच्या वतीने तसेच अ‍ॅडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती आणि आम्ही हर्षाली च्या नेतृत्वाखाली वसईतील  चार जणांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यात महाराष्ट्रातील 5 गुजरात मधील 5 आणि   इंदोर मधील एक व हरियाणातील 1 अशा एकूण 12 गिर्यारोहकांचा समावेश होता.

प्रवास खडतर तरी पहिला प्रयत्न अयशस्वी !दि 15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर  व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास सुरू केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर  कॅम्प 1 ते समिट पर्यंत 4  हजार फुटावर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे अवघ्या 300  मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल 17 तासांची मेहनत वाया गेली.मात्र  वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही आणि शेवटी दोघाना तंबूतच राहावे लागले.

 पुन्हा नव्याने प्रयत्न जिद्द सोडायची नाही !

पुन्हा नव्या जोमाने गटप्रमुख हर्षांली वर्तक यांच्या गटामधील 4  तर दुसऱ्या गटात 6 जणांनी रात्री 10 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा-14 ही मोहीम सर करायला सुरुवात केली. अत्यंत बोचरी थंडी, गुडघाभर  बर्फ,  सतत सुरू असलेली बर्फवृष्टी अशा कठिण आव्हानांना सामोरे जात 12 तासांची पायपीट करत अखेरीस दि27 जुलै ला  सकाळी 10  वाजता चंद्रभागाच्या शिखरावर पोहोचले. आणि काय तर तेथे पोहोचताच अभिमानाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. हर्षांली वर्तक हिच्या गटात विरारचे नितीन गांधी,औरंगाबादचा प्रविण शेलके, इंदूरची अ‍ॅनी होते तर वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम मात्र अर्धवटच सोडावी लागलीतरी मात्र कोरोना काळात अशा मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी आणि प्रयत्न करत सर केल्याने  या सर्व वसई तील चारही गिर्यारोहकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

‘आता स्वप्न कांचनगंगा सर करण्याचे..हर्षांली वर्तकने देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या असून यात माऊंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने आजवर सर केल्या असून आता लक्ष केवळ "कांचनगंगा" ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची प्रबळ इच्छा तिने लोकमत शी बोलताना व्यक्त केली असून तिचे ते हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात अजिबात शंका नाही