विरार : वसई-विरार परिसरात मोटारसायकल चोरणारी आणखी एक टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. तीन अल्पवयीन मुलांसह नऊ मोटारसायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.वालीव पोलिसांनी एक टोळी ताब्यात घेतल्यानंतर दुसºयाच दिवशी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना अटक केली. त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा, तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मिळून नऊ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. मौजमजेसाठी पैसे मिळावेत म्हणून ते चोरी करायचे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मोटारसायकल चोरणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:03 IST