शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस साजरा करण्यास चाललेल्या आईच्या काळजावर घाला; हातून ११ महिन्याचे बाळ निसटले, झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 23:29 IST

सुरभी हॉटेल जवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना अंदाज आला नाही व दुचाकी घसरली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून आपल्या दोन मुलांना घेऊन पतीसह  जात असताना भाईंदर येथे दुचाकी घसरून मांडीवरील ११ महिन्याचे बाळ पडून त्याचे अपघाती निधन झाले.

भाईंदर पश्चिमेच्या बबूदा रेसिडेन्सी मध्ये कुणाल शहा, पत्नी जिग्ना, ५ वर्षांची मुलगी कियरा आणि ११ महिन्यांचा मुलगा दक्ष असे कुटुंब राहते. शनिवार २५ नोव्हेंबर रोजी जिग्ना यांचा वाढदिवस असल्याने ते गोराई समुद्रकिनार्‍यावरील एका रिसॉर्ट मध्ये वाढदिवस साजरा करणार होते. सायंकाळी ४ च्या सुमारास कुणाल हे जिग्ना, कियरा व दक्ष असे स्कूटररून गोराईला जाण्यास निघाले होते. 

कियरा ही पुढे होती तर जिग्ना ह्या दक्षला मांडीवर घेऊन मागे बसल्या होत्या. परंतु राई आणि मोरवा दरम्यान  सुरभी हॉटेल जवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना अंदाज आला नाही व दुचाकी घसरली. अचानक घडलेल्या ह्या घटनेने जिग्ना यांच्या हातातून दक्ष हा खाली पडला. चिमुरड्या दक्ष च्या डोक्याला जबर मार लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. तर कुणाल , जिग्ना व कियरा हे तिघेही जखमी झाले आहेत. 

भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकात नाईकवाडे यांच्या मार्गदशनखाली पोलिस ह्या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात