शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:18 IST

याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

जव्हार : मोखाडा तालुक्याची मातामृत्यूची घटना ताजी असताना एका मातेची प्रसूती होत असताना अचानक तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री घडली आहे. तिची प्रकृती चांगली होती, स्वतःहून प्रसूतीकरिता गेली, मात्र अचानक तिचा मृत्यू कसा झाला? याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कुंता वैभव पडवळे (वय ३१) या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूतीकरिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात नियमित उपचार सुरू होता, मात्र येथे सुविधा नाहीत, तुम्ही जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगून पुढील उपचारासाठी तिला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मातेची ही तिसरी प्रसूतीची वेळ होती. रात्री १२ वाजेच्या दरम्यान तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली. काही वेळातच अचानक हृदय थांबले आणि मातेनी तिथेच दम सोडला. दरम्यान, बाळाचे ठोके सुरू असल्याने बाळाची प्रसूती करण्यात आली, मात्र प्रसूती होता होता बाळाचाही मृत्यू झाला.

माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती, तिचा नियमित उपचार कुर्झे प्राथमिक आरोग्य केंद्रात व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होता. आम्ही तिला जव्हारला रुग्णालय दाखल केले. अवघ्या दहा मिनिटात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती मिळाली. थोड्या वेळाने बाळाचाही मृत्यू झाल्याची खबर मिळाली. आम्हाला हे ऐकून धक्काच बसला आहे. - अंकुश विष्णू अतकारी, चाबके-तलवली, मातेचा भाऊ

प्रसूती वेळी माता व्यवस्थित होती, मात्र तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा अर्ध्या प्रसूतीतच मृत्यू झाला. बाळाला वाचविण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला, मात्र दोघांचा मृत्यू झाला. याबाबत शवविच्छेदनानंतर खरे कारण कळेल.-  भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल