शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या मासिक सभा ‘डिजिटल’, सहकार आयुक्तांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:10 IST

इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्यासंबंधीचे परवानगी देणारे एक परिपत्रक जारी केल्याची माहिती वसई उपनिबंधक योगेश देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.

आशीष राणे वसई : सहकारी संस्थांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सहकारी संस्थांच्या मासिक तसेच तातडीच्या बैठका, सभा, त्यातून होणारे निर्णय व इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे आता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सहकारी संस्थांच्या बोर्ड मीटिंग घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्यासंबंधीचे परवानगी देणारे एक परिपत्रक जारी केल्याची माहिती वसई उपनिबंधक योगेश देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात होऊ नये, त्यासाठी सरकार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. त्या अनुषंगाने सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक, प्रवास पूर्णपणे बंद असल्याने सर्व सहकारी संस्थांच्या मासिक (बोर्ड) सभा घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असून अधिकारी-पदाधिकारी यांना सभेस उपस्थित राहता येत नाही. तर सहकारी संस्थांच्या उपविधीतील तरतुदीनुसार संचालक मंडळाची दरमहा मासिक बैठक घ्यावी लागते.परिणामी सहकार आयुक्तांच्या या परिपत्रकात म्हटल्यानुसार सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती विचारात घेता राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी लॉकडाऊनची परिस्थिती असेपर्यंत मासिक सभा व्हिडीओ कॉन्फरसिंग किंवा डिझिटल पर्यायांचा वापर करून घेण्यात यावी. मात्र सभेचा अजेंडा सर्व समिती सदस्यांना वेळेवर व्हाट्सअप किंवा ई-मेलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून मिळेल याची दक्षता सर्व सहकारी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सचिवांनी घ्यावयाची आहे. तसेच जे अधिकारी, पदाधिकारी सभेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, त्यांनी मात्र ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन होईल याची दक्षता घ्यावयाची आहे. तसेच मास्क घालूनच सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावयाचे असल्याचे सहकार आयुक्तांनी निर्देशित केले आहे.>परिपत्रक स्वागतार्हकोरोनामुळे सहकारी संस्थांवर ओढवलेल्या परिस्थितीतदेखील राज्याच्या सहकार आयुक्तांनी संस्थांच्या मासिक सभांसाठी प्रथमच डिजिटल पद्धतीला प्राधान्य देणारे काढलेले हे परिपत्रक नक्कीच मार्गदर्शक व स्वागतार्ह ठरेल. वसई तालुक्यातील सात हजारांहून अधिक छोट्यामोठ्या संस्था याचा अवलंब नक्की करतील, असा विश्वास वसई उपनिबंधक योगेश देसाई यांनी व्यक्त केला.