शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भातपीक नुकसानीची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:21 IST

अधिकाऱ्यांकडे उत्तरेच नाहीत : अधिकाऱ्यांना धरले धारेवर; कमी नुकसान झालेली शेती दाखवली

वाडा : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून पावसामुळे पिके वाया गेली आहेत. वाडा तालुक्यातही परतीच्या पावसाने भातिपकाचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले. दरम्यान, खोत यांनी अधिकाºयांना विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता न आल्याने त्यांना चांगलेच धारेवर धरले.

फलोत्पादन तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाडा तालुक्यातील कुडूस, खुपरी, गातेस बु., सापने तसेच पालघरमधील कुडे हलोली येथील शेतकºयांच्या भातशेतीत जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या भात पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. गातेस येथे बांधावर थांबून कृषी मंत्री खोत यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली. तालुक्यात १४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून सर्वच पीक वाया गेल्याचे तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी मंत्र्यांना सांगितले. भाताबरोबर गुरांचा चाराही वाया गेल्याचे शेतकºयांनी खोत यांना प्रत्यक्षात दाखवले. यावेळी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये असे आदेश तहसील तसेच कृषी प्रशासनाला दिले. पंचनामे केलेल्या शेतकºयांची यादी ग्रा.पं. कार्यालयात लावा, म्हणजे एखादा शेतकरी राहिला तर त्याला त्या यादीत समाविष्ट करता येईल अशा सूचना देखील खोत यांनी केल्या.पदाधिकारी मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यात व्यस्तकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाड्याचा दौरा करीत भातिपकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांच्या व्यथा मंत्र्यांकडे मांडण्याऐवजी ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यात व्यस्त असल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.कमी नुकसान झालेली भातशेती : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही भागातील शेतीत तीन ते चार फूट पाणी असून कापलेले भातपीक पाण्यावर तरंगत आहे. खूप नुकसान झालेली ही भातशेती कृषी विभागाने मंत्री महोदयांना जाणीवपूर्वक दाखवली नसल्याने शेतकºयांनी सदाभाऊ खोत यांच्यासमोरच संताप व्यक्त केला.वाडा कोलम नामांकनासाठी प्रयत्न करणार : वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, या कोलमला नामांकन नाही. त्याला नामांकन मिळावे अशी मागणी काही शेतकºयांनी केली असता यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खोत यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार