शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत सोमवारी भाजपाची भव्य रॅली, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 03:48 IST

या नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकून डहाणूत पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केल्याबद्दल सोमवारी डहाणूत विशाल विजय रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीस केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

- शौकत शेखडहाणू : या नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकून डहाणूत पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केल्याबद्दल सोमवारी डहाणूत विशाल विजय रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीस केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जि.प.अध्यक्ष विजय खरपडे, नौशिर इराणी यासह भाजपचे वरीष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. डहाणूचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत राजपूत यांना ही उमेदवारी देण्यास डहाणूची सून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा सिंहाचा वाटा होता.डहाणू नगर परिषद हा वर्षानुवर्ष राष्ट्रवादीचा गड राहीली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या भरत राजपूत यांनी जोरदार लढत देऊन २५०० मताधिक्याने नगराध्यक्षपद जिंकून भाजपचा झेंडा रोवला. तर नगरसेवक पदाच्या १५ जागा जिंकून भाजपचे एकहाती सत्ता खेचून आणली. भाजपच्या या यशामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड गमवावा लागला आहे. भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.त्यामुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह सर्व नेते या विजय रॅलीत उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBJPभाजपा