शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा बीडीओने हात झटकले, बेलगाम पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:33 IST

तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचवावा यासाठी पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजनाचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो

रविंद्र साळवे 

मोखाडा : पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागला पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील कारभार रामभरोसे असून आंधळं दळते कुत्रं पिठ खाते अशी काहीशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे. मात्र मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे ह्या मूग गिळून गप्प आहेत यामुळे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांच्या भोंगळ कारभाराला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांची बदली झाल्याने गेल्या चार महिन्यापासून हे पद रिक्त आहे यामुळे डॉ बी के पाटील हे प्रभारी म्हणून कारभार बघत आहेत परंतु त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पशुसंवर्धन विभागातील विविध योजनाना ब्रेक लागला आहे

तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचवावा यासाठी पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजनाचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो. यामध्ये अनुदानीत संकरीत गाय व म्हैस वाटप योजना, अनुदानीत समृध्द योजनेतून भांडी पुरवठा, तबेले धारकांना खोडा वाटप तसेच दुधाळ जनावरे व दुभत्या जनावरांसाठी पशुखाद्य वाटप, वंधत्व निवारण शिबीरे, आदी योजना या विभागाच्या अंतर्गत राबविल्या जात असून त्याचबरोबर गाई बैल म्हैस यांच्या निवाº्याची व्यवस्था व्हावी यासाठी रोहयो अंतर्गत गोठ्यांची बांधणी करण्याची योजनाही राबविली जाते. या योजनेतील ही प्रकरणे पशुसंवर्धन विभागाने तपासून रोहयो विभागाला पाठवायची असतात. परंतु पशुसंवर्धन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील गोठ्यांची शेकडो प्रकरणे गेल्या वर्षभरापासून धूळखात पडली आहेत.यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अधून - मधून कार्यालयात येणारे बी के पाटील यांच्या अनागोंदी कारभारामुळे गोठयांच्या प्रकरणासह विविध योजनांची प्रकरणे टेबलावर धूळखात पडली आहेत. यामुळे येथील आदिवासी बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.जर याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर शेतकरी उग्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.याबाबत गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांना विचारणा केली असता आम्ही काहीही करू शकत नाही त्यांच्यावर जिल्ह्यावरून कारवाई केली जाऊ शकते असे उत्तर माध्यमांना देऊन आम्ही त्यांना पाठीशी घालतो किंवा मोकाट सोडतो आहोत याची जणू काही कबुलीच दिली.यामुळे विकास कामांना कशी चालना मिळणार.? असा प्रश्न निर्माण झाला आहे मुळात संबंधित अधिकाº्याची बदली झाल्यावर त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आल्यावरच त्यांना कार्यमुक्त केले जाते.येथे कार्यरत असलेले पशू वैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्याने येथील पशू वैद्यकीय अधिकारी पद रिक्त झाले व मोखाडा येथील पशु धन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला यामुळे पाटील मोखाडा पशु वैद्यकीय दवाखाना व मोखाडा पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभाग सांभाळत आहे त्यातच कामसू वृत्तीचा अभाव असल्याने विविध योजनांना ब्रेक लागला आहे व लाभार्थ्यांची कुचंबणा होत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीVasai Virarवसई विरार