मोबाईलचे दुकान जव्हारमध्ये फोडले

By Admin | Updated: October 6, 2015 23:22 IST2015-10-06T23:22:04+5:302015-10-06T23:22:04+5:30

टॉवर जवळील नगर पालिकेच्या गाळ्यातील इमरान चाबुकस्वार यांच्या दारेन कम्युनिकेशन या मोबाईल शॉप मध्ये सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गाळयाच्या मागील

The mobile shop was put on fire | मोबाईलचे दुकान जव्हारमध्ये फोडले

मोबाईलचे दुकान जव्हारमध्ये फोडले

जव्हार : टॉवर जवळील नगर पालिकेच्या गाळ्यातील इमरान चाबुकस्वार यांच्या दारेन कम्युनिकेशन या मोबाईल शॉप मध्ये सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गाळयाच्या मागील भिंत व पत्रे तोडून जवळ-जवळ २ लाख २५ हजारांचे मोबाईल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. या सर्व चोरीचे चित्रिकरण सीसीटीव्ही फुटेज मध्ये झालेले आहे व चोराचा चेहराही स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चाबुकस्वार यांचे दुकाने पंचायात समितीच्या कार्यालया मागे आहे, त्यामुळे गाळ्याच्या मागील बाजूस चोरी करतांना काहीच दिसत नाही, याचाच फायदा घेत मध्यरात्री १२.०० ते १.०० च्या सुमारास सिमेंटचे पत्रे व मागील बाजूची भिंंत फोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला. याबाबत चाबुकस्वार यांना पहाटे एका व्यक्तीने फोनवरून कळवले. त्यानंतर त्यांनी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
यापूर्वीही चाबुकस्वार यांच्या गाळ्यात अशाच प्रकारे दोन वेळा चोरी होऊन मोेठे नुकसान झाले होते. परंतु त्या चोरीचा कोणताही छडा अद्याप पोलीसांकडून लागलेला नाही. महत्वाचे म्हणजे म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हारला असतांनाही, वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस नियंत्रणेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: The mobile shop was put on fire