शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:03 IST

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला.

- मंगेश कराळे

नालासोपारा:- वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण भोईर, प्रफुल पाटील, पदाधिकारी जयेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी शर्मिला राज ठाकरे या सुद्धा सामील झाल्या होत्या. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नसून वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार असल्याचे भाषणात सांगून राज्य सरकारला ठणकावले आहे. तसेच पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांन वेळ नसल्यामुळे उदघाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेल्यामुळे वसई विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी मनपावर मोर्चा काढला होता. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी दुसर्‍या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन असे शर्मिला ठाकरे यांनी  यावेळी सरकारला ठणकावले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विरार पोलिसांनी मोर्च्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवsharmila thackerayशर्मिला ठाकरेVasai Virarवसई विरार