शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आजपासून मनसे उपोषण

By admin | Updated: December 15, 2015 00:52 IST

आश्रमशाळा व त्यांची वसतीगृहे यातील भयाण वास्तव दाखविणारी चित्रफीत मनसेने तयार केली असून या अनागोंदीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात

- हितेन नाईक,  पालघरआश्रमशाळा व त्यांची वसतीगृहे यातील भयाण वास्तव दाखविणारी चित्रफीत मनसेने तयार केली असून या अनागोंदीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दोनशे मनसे सैनिक उद्या मंगळवारपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहांची अनेक वर्षापासूनची दयनीय अवस्था, अनागोंदी कारभारा विरोधात न्यायालयीन याचिका दाखल होऊनही थोडाही फरक पडला नाही. करपलेल्या चपात्या, आळ्या पडलेले अन्न, मोडकळीस आलेली मुलींची शौचालये, मुदत संपलेले तेल, मसाला, बुरशी आलेले गहू अशा भयाण वातावरणामध्ये सध्याचे आदिवासी कसेबसे आयुष्य कंठत आहेत. आपल्या भागातील आदीवासी मंत्री तथा पालकमंत्री असतानाही ही अवस्था आहे. या सारखे दुसरे दुर्दैव नसल्याची भावना या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आदिवासी विभागाचे बजेट साडेपाच हजार कोटींचे असताना या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा व वस्तीगृहाच्या नरक यातना मागील १५-२० वर्षांपासून जराही कमी झालेल्या नाहीत. स्वत: आदिवासी असूनही व त्या समाजाच्या व्यथा जवळून अनुभवणाऱ्या आदिवासी विकासमंत्री विष्णूसवरा यांच्याकडे मंत्रीपद गेल्यानंतर तरी या विद्यार्थ्यांच्या यातना संपुष्टात येतील या त्यांच्या भाबड्या आशेवर पाणी फिरवले गेल्याची संतप्त प्रतिक्रीया या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लघंन१४ फेब्रुवारी २००५ रोजी उच्च न्यायालयात राज्यातील सर्वच आदीवासी आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये उत्कृष्ट अन्न, शुद्ध पाणी व इतर सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ०७ सप्टें. २००९ रोजी झालेल्या या याचिकेच्या सुनावणीत सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश दिले होते. दोन महिन्यांपासून होत होते चित्रणदोन महिन्यांपासून पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम, उपाध्यक्ष आशिष मेस्त्री, संजीव सतीश जाधव, सुल्तान पटेल, विवेक केळुस्कर, प्रणय पाटील आदीनी पालघरमधील कुर्झे, भोपोली, कावका (जव्हार), सासरा, न्याहाळा, ढेकाळे, मेढवण (खुटल) कासळगाव, बेटेगाव, दाबेरी आदीसह दोन वस्तीगृहाचे चित्रणकरून तयार केलेली चित्रफीत पत्रकार परिषदेत सादर केली.यामध्ये विद्यार्थ्यांच्या हलाखीचे चित्रण दाखविल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून योग्य सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांच्या नेतृत्वाखाली दोनशे मनसे सैनिक आमरण उपोषणास बसणार आहेत.