शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पालकमंत्र्यावर आरोप प्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माफी मागावी; भाजपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:55 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले.

-  मंगेश कराळे नालासोपारा - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक आणि एकदिलाने करत असलेले काम पाहून बविआच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा त्यांनी माफी मागावी. नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. 

पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक ठेकेदाराकडून २० कोटी रुपये जमा करण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भाष्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वैयक्तिक टीका केली होती. त्यांच्या या आरोपांतील निराधारता; किंबहुना आमदार  ठाकूर यांच्या माध्यमातूनच शहरात कशापद्धतीने गैरव्यवहार सुरू आहेत, याची माहिती देण्याकरता भाजपच्या वतीने गुरुवारी नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मनोज पाटील यांनी आमदार ठाकूर यांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांच्या आरोपांतील फोलपणा दाखवून दिला. आमदार ठाकूर हे बविआ हा पक्ष समजत असले तरी ती एक संघटना आहे. त्या संघटनेचा स्वत:चे चिन्ह नाही. या संघटनेचा दोन खाड्यांपुरता आवाका आहे. त्यांच्या या सीमितपणावर उपमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही राजकीय स्वरूपाची होती. पण या टीकेला आमदार ठाकूरांनी वैयक्तिक टीकतून उत्तर दिले आहे. त्यातून त्यांना आलेली वैफल्यता दिसून येते. पालकमंत्र्यांवरील खंडणीचे आरोप तर हास्यास्पद आहेत.

निवडणूक काळात अनेक पक्ष विविध औद्योगिक-सामाजिक संघटना आणि समाजातील घटक आणि व्यावसायिकांना भेटत असतात. त्यांच्यासोबत बैठका घेत असतात. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांना या बैठका किंवा या संघटनांसोबतचा संवाद दिसला नाही. त्यांना केवळ कंत्राटदारच कसे दिसले? त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेच कसे दिसले? असा प्रश्न मनोज पाटील यांनी केला. कदाचित वर्षभर आमदार ठाकूर अशाच पद्धतीने खंडणी वसूल करत असतात. त्यामुळे या बैठकांतून आपल्यासारखीच कुणी तरी खंडणी वसूल करत आहे, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकली असावी, त्यातून त्यांनी हा आरोप केला असावा, अशी शंका त्यांनी या वेळी व्यक्त केली.

वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४palgharपालघरBJPभाजपा