शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर मद्यपींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:12 IST

पोलिसावरच चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले

मीरा रोड : धुळवडीच्या दिवशी शुक्रवारी दारू पिऊन भांडण करणाऱ्यांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावरच चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.

भाईंदर पोलिस ठाण्याच्या गोपनीय विभागात काम करणारे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे हे शुक्रवारी एकटेच साध्या वेशात गस्त घालून धुळवडीनिमित्त माहिती घेत होते. पोद्दार शाळेजवळ शिवमहिमा इमारत आणि मागील झोपडपट्टीदरम्यानच्या मैदानात दारूच्या नशेत असलेले काही जण भांडण करत असल्याचे पाहून भानुसे भांडण सोडवण्यासाठी गेले.    सात टाके पडले 

याचा राग धरून दिलीप खडका उर्फ नेपाळी, कमलेश गुप्ता उर्फ बाबूसह त्यांच्या दोघा साथीदारांनी भानुसे यांच्याशीच हुज्जत घातली. त्यातच एकाने भानुसे यांच्या पोटात चाकू खुपसला. 

रक्तबंबाळ अवस्थेत भानुसे यांना रुग्णालयात दाखल केले. भानुसे यांच्या पोटाला दोन टाके, तर हाताला ५ टाके पडले. जखम खोल व गंभीर असल्याने मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे. दिलीप गणेश देवलनगर इथे, बाबू चाचा भतिजा इमारतीत राहतो आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी