शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर कोरोना संसर्गाच्या संकटात विक्रेत्यांकडून मापात पाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 13:11 IST

कोरोना संसर्ग झपाट्याने पसरून रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . लोकं मास्क न घालता गर्दी करत फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने पसरत असल्याने फळ - भाजी , किराणा , मटण आदी विक्रेत्यां वर निर्बंध आणतानाच घरपोच सेवेवर भर देण्याचा नियम लागू केला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - कोरोना संसर्गाच्या संकटात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असताना दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मात्र मापात पाप करून ग्राहकांची लुबाडणूक करत असल्याचा प्रकार वाढीला लागला आहे . 

 

कोरोना संसर्ग झपाट्याने पसरून रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . लोकं मास्क न घालता गर्दी करत फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने पसरत असल्याने फळ - भाजी , किराणा , मटण आदी विक्रेत्यां वर निर्बंध आणतानाच घरपोच सेवेवर भर देण्याचा नियम लागू केला आहे . अनेक ठिकाणी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत तर अनेक ठिकाणी लपून भाजी - फळ विक्रेते व्यवसाय करत आहेत . भाजीवाले तर बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यां मध्येच भाज्या बांधून त्याची विक्री करत आहेत . 

 

अश्या स्थितीत अनेक विक्रेते हे वजनात पाप करत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत . वजनासाठी इलेक्ट्रिक वजन काटा तसेच वजन मापे विभागाचा शिक्का असलेली वजने विक्रेत्यांनी वापरणे बंधनकारक आहे . परंतु अनेक ठिकाणी वजन काट्यात किंवा वजनात हेराफेरी करून ग्राहकांना फसवले जात आहे . 

 

भाईंदरच्या भावना घरत म्हणाल्या कि , भाजी - फळ विक्रेते यांच्या कडून घेतलेल्या वस्तूंचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यास ते कमी असते . असे प्रकार अनेकवेळा होतात . पण सर्वसामान्य गृहिणी प्रत्येक वेळी कुठे वजन तपासत बसणार ? त्यामुळे वजनात फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून अश्यांचे व्यवसाय बंद करायला हवेत . 

 

मच्छिमार नेते आणि शिवसेना शहर प्रमुख बर्नड डिमेलो यांनी एका मटण विक्रेत्याने मापात पाप करून लोकांची चालवलेली फसवणूक उघडकीस आणली आहे . उत्तन नाका जवळ खाडी वर बांधलेल्या एका मटणाच्या दुकानात रविवारी डिमेलो हे गेले असता दुकानदाराने वजनकाट्यावर वजन दाखवून मटण दिले . डिमेलो यांना संशय आल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर पुन्हा वजन करण्यास सांगितले असता तब्बल १५० ग्राम मटण कमी असल्याचे उघड होताच विक्रेत्याच्या तोंडचे पाणी पळाले . 

 

शहरात वजनमापे विभाग झोपा काढत असून त्यांच्या संगनमतानेच ग्राहकांची लूट सुरु असल्याचा आरोप करत डिमेलो यांनी सदर घटनेची तक्रार केली आहे . शहरात अनेक मटण व फळ - भाजी विक्रेते तसेच किराणा विक्रेते आदी सदोष वजनमापे व काटे वापरून कमी वजनाचे सामान  देउन नागरिकांची सर्रास लूट करत आहेत . हे प्रकार  नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना आणि फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना धडा शिकवू असा इशारा डिमेलो यांनी दिला आहे .