शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 21:24 IST

भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते .

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - पावसाळा सुरु झाल्या पासून सातत्याने खड्डयां मुळे त्रासलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावले . फडणवीस येणार असल्याने त्यांच्या आगमन मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात आले .शुक्रवारी रात्री फडणवीस यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला . 

भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते . फडणवीस येणार असल्याने दहिसर चेकनाका पासून काशीमीरा नाका पर्यंतच्या महामार्गवर तसेच तेथून थेट उत्तन पर्यंतच्या रस्त्यावर  पडलेले मोठमोठे खड्डे महापालिका आणि एमएमआरडीएच्या मेट्रो ठेकेदाराने युद्धपातळीवर बुजवण्यास घेतले होते. 

संपूर्ण रस्ता स्वच्छ चकाचक करण्यात आला होता . नाक्या नाक्यावर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस तैनात होते .  त्यामुळे मंत्र्यांनी नियमितपणे शहरास भेट दयावी अशी टिप्पणी नागरिकांसह राजकीय स्तरावरून केली हात आहे . पोलीस आयुक्त सदानंद दाते , महापालिका आयुक्त दिलीप ढोले तसेच अधिकारी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड रवी व्यास , माजी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , महिला जिल्हाध्यक्षा रिना मेहता आदींनी फडणवीस यांचे उत्तन येथे स्वागत केले . 

पोलीस आयुक्तालयाच्या कामाचा आढावा उत्तन येथील कार्यक्रम आटपून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी रात्री मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयास भेट दिली . आयुक्त दाते यांच्यासह अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , उपायुक्त विजयकांत सागर , अमित काळे , संजयकुमार पाटील व  प्रशांत वाघुंडे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते . 

यावेळी फडणवीस यांनी आयुक्तालयाच्या एकूणच कामकाजाचा आढवा घेतला . आयुक्तालयाने राबवलेले विविध उपक्रम व गुन्हे यांची उकल आदी बाबतीत पोलिसांचे कौतुक केले . पोलीस आयुक्तालयासाठी हवे असलेले मनुष्यबळ , मुख्यालयाचे काम , आवश्यक कामांसाठी लागणारा निधी आदींची माहिती घेऊन शासना कडून लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले .यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा सोबत होते . 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMira Bhayanderमीरा-भाईंदर