शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

खनिज, महसूलची दीड कोटी दंडवसुली; तहसिलची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:28 IST

अवैध धंद्यांविरोधात सतर्कता

राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील तहसील तलाठी कार्यालयातील महसूल विभागाकडून विविध भागातील १३ तलाठी कार्यक्षेत्रानुसार गौण खनिजांच्या अवैध धंद्याविरुद्ध सतर्कराहून अद्यापपर्यंत तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी व १३ तलाठी सजेअंतर्गत टिमने डबर, खडी गौण खनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर पकडून १ कोटी ७ लाख ३० हजारांची गौण खनिजाची दंड वसुली तर जमीन महसूल अंतर्गत ३८ लाख ९८ हजार अशी दोन्ही मिळून १ कोटी ४६ लाख २८ हजारांची वसुली केली असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

या वेळी मंडळ अधिकारी महसूल अव्वल कारकून, लिपिक तलाठी आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने गौण खनिज वसुलीत मोलाचे सहकार्य केले. विक्र मगड तालुक्यात चोरट्या मार्गाने डबर, माती, खडी अशा गौण खनिजाची वाहतूक व उत्खन्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून इष्टांकानुसार दंड वसुलीचे आदेश दरवर्षी प्रत्येक तहसील कार्यालयास देण्यात येत असतात. त्यामध्ये विक्रमगड तहसीलकरिता जमीन महसुलाचे उद्दिष्ट ९० लाख होते. त्यामध्ये ४३.३१ टक्के वसुली करण्यात आली आहे, तर गौण खनिजामध्ये उद्दिष्ट १ कोटी १६ लाख ४५ हजारचे होते. त्यामध्ये ९२.१४ टक्के वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने गौण खनिज वाहतूक करणाºयांना या दंड वसुलीतून चांगलाच चपराक मिळालेला आहे. परंतु महसूल विभागाने विक्रमगड तालुक्यात कर्मचारी वर्ग अपुरा असतानाही तसेच इतर विभागाची कामेही महसूल विभागाला पाहावी लागत असतानाही याबाबत सतर्कराहून वेळोवेळी मोहीम राबवून चोरट्या गौण खनिजांची वाहतूक करणाºया वेगवेगळ्या गाड्या पकडून तब्बल १ कोटी ७ लाख ३० हजारांची गौण खनिज दंड वसुली करून व जमीन महसूल दंड वसुलीमध्ये ३८ लाख ९८ हजाराची शासनाच्या तिजोरीत भर पाडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चोरट्या मार्गाने गौण खनिज उत्खनन करणाºयांचे धाबे दणाणले आहे. या वर्षभरात अशीच मोहीम राबवून दंड वसुली केली जाईल, असे निवासी तहसिलदार सुरेश कामडी यांनी सांगितले.तालुक्यातील गौण खनिज उत्खनन करणारे व त्यावर व्यवसाय करणाºयांनी तहसील कार्यालयाकडून अधिकृतरीत्या परवानगी (रॉयल्टी) घेऊन शासनाचे व स्वत:चे होणारे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे. - श्रीधर गालिपेल्ली, विक्रमगड तहसिलदार