शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

न्यायालयाच्या इमारतीचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:52 IST

याचिका दाखल : सिडकोच्या मनमानीला पालघर बार असोसिएशनचा विरोध, पक्षकारांना होणार त्रास

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर नवनिर्मित जिल्हा मुख्यालयात इमारतींची रचना करताना जिल्हा न्यायालय इमारत ही जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागाच्या इमारतींलगतच (सेक्टर १५ मध्ये) करण्याचे ठरले होते. तरीही अचानक ही इमारत पूर्वेकडील नंडोरे येथे हलवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षकारांना याचा त्रास होणार आहे. सिडकोच्या या मनमानी निर्णयाविरोधात पालघर जिल्हा बार असोसिएशनने आंदोलनाचा पवित्रा घेत न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.पालघर जिल्हा नवनिर्मित कार्यालयाच्या इमारतीसाठी राज्य शासनाने पालघर-बोईसर रोडवरील दुग्ध प्रकल्पाची एकूण ४४०.५७.९० हेक्टर एवढी जमीन सिडकोला विकसित करण्यासाठी दिली आहे. त्यातील १०३.५७.९० हेक्टर जमीन विकसित करून उर्वरित ३३७ हेक्टर जमिनीची विक्री करून सिडकोला आपला खर्च भागवायचा करार करण्यात आला आहे.या करारानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य विविध महत्त्वपूर्ण विभागांच्या इमारती जनतेच्या हितासाठी एकाच ठिकाणी उभारण्याचा ठराव २७ जुलै २०१९ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि त्याला ठरावान्वये मान्यताही देण्यात आली होती.तसेच एका जनहित याचिके-संदर्भात (क्र. १५६/२०११) उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कोर्ट संकुलासाठी योग्य जागा आरक्षित करण्याबाबत नियोजन प्राधिकरणाला योग्य निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना पालघर जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत कोळगाव सेक्टर १५ मधून नंडोरे येथे हलवण्यात आली आहे.सिडकोने घेतलेल्या मनमानी निर्णयावर बार असोसिएशनने नाराजी व्यक्त करतानाच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर बार असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून उचित कार्यवाही करण्याबाबत कळवले होते.पालघर महसुली जिल्हा होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पालघरमध्ये जिल्हा कोर्टाची इमारत बांधण्यात आलेली नाही. उलट पक्षकारांना गैरसोयीचे होणार असतानाही कोळगाव येथील सेक्टर १५ मधील इमारत शहारापासून ६ ते ७ कि.मी. दूर अशा औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषित वातावरणात नंडोरे येथील सेक्टर ३ येथे हलवण्यात आली आहे.न्यायाधीश-कर्मचाºयांचे निवासस्थाने गरजेची : शासन निर्णयाप्रमाणे पक्षकार, वकिलांच्या आणि न्यायदानाच्या दृष्टीने जिल्हा तसेच सत्र न्यायालयाच्या ठिकाणी तसेच लगतच्या जागेमध्ये औद्योगिक कामगार, सहकार, कौटुंबिक आदी न्यायालयाचे न्यायाधीश आणि कर्मचाºयांचे निवासस्थान बांधणे गरजेचे तसेच अत्यावश्यक आहे. असे असतानाही प्रस्तावित आराखड्यात मात्र जिल्हा न्यायालयाची व्यवस्था दूरवर करण्यात आल्याची बाब असोसिएशनने पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली.बार असोसिएशनची मागणीच्औद्योगिक, कामगार, सहकार, कौटुंबिक इत्यादी न्यायालयाचे न्यायाधीश आणि कर्मचारी यांची निवासस्थाने बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आता देण्यात आलेल्या पाच एकर जागेऐवजी २५ एकर जागा आरक्षित करण्याचे निर्देश सिडकोला देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बार असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.च्जिल्हा मुख्यालयात इमारतीची रचना करताना जिल्हा न्यायालय इमारत ही जिल्हाधिकाºयांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागाच्या इमारतींलगतच असायलाहवी. न्यायालयाची इमारत अन्यत्र हलवल्यास वकिलांबरोबरच पक्षकारांना मोठा त्रास होणार आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.सुरेश महाडिक, सचिव प्रशिला मोगरे, अ‍ॅड.माळी, अ‍ॅड.सुधीर गुप्ता आदी उपस्थित होते.