शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दापचरीत ४६० हेक्टरवर एमआयडीसी; स्थानिक रहिवाशांचे राहणीमान उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:33 IST

दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाच्या एकूण ९०७.२९ हेक्टर जागेपैकी ४६० हेक्टरवर एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तर उर्वरीत ४४७.२९ हेक्टर जमीन दुग्ध प्रकल्पाच्या विविध योजनांकरीता वापरता येणार आहे.

- हितेन नाईकपालघर : दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाच्या एकूण ९०७.२९ हेक्टर जागेपैकी ४६० हेक्टरवर एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तर उर्वरीत ४४७.२९ हेक्टर जमीन दुग्ध प्रकल्पाच्या विविध योजनांकरीता वापरता येणार आहे. सध्या पालघर जिल्ह्यात कुडूस-वाडा, बोईसर-तारापूर वगळता इतरत्र औद्योगिक क्षेत्र नाही. नजिकच्या काळात डहाणू येथील प्रस्तावित वाढवण बंदर आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची योजना पाहता दापचरी येथील नव्या एमआयडीसीमुळे पालघर जिल्ह्याच्या सर्र्वांगिण विकास होऊन तेथील स्थानिक रहिवाशांचे राहणीमान उंचावू शकते, असा आशावाद महाराष्ट्र शासनाने ही जमीन उद्योग खात्याकडे हस्तांतरीत करतांना व्यक्त केला आहे.मुंबईपासून १५० किलोमिटर अंतरावर मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुग्ध प्रकल्प, दापचरीची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली असून त्याकरीता २६७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली होती. या प्रकल्पाकरीता विरोली नदीवर धरण (१३८० मिलीयन लीटर क्षमता ) धरण बांधण्यात आलेले आहे. प्रकल्पात गोशाळा योजनेबरोबरच वैरण बीज उत्पादन योजना व भाजीपाला योजना राबविण्यात आली होती. प्रकल्पात १७० संलग्न व १०० गावठाण पध्दतीची दुग्धव्यवसाय क्षेत्र शेतक-यांना वाटप करण्यात आलेली आहेत. प्रत्येकी एक हेक्टर दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये १२ गायी करीता गोठा बांधण्यात आलेला होता तर राहण्याकरीता निवासस्थान व हिरवा चारा उत्पादनाकरीता क्षेत्र राखीव ठेवण्यात आला होता.हा प्रकल्प रखडल्याने त्यात गोशाळा योजने सोबत वैरण बीज उत्पादन योजना व भाजीपाला योजना राबविण्यात आली.एकूण संपादित ८०० कृषिक्षेत्रातून फक्त १७० युनिटचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.मात्र योग्य नियोजनाच्या अभाव आणि सन १९७४ मध्ये मुंबईतील तबेले मालकांनी १५० किमी लांब दापचरी येथे जाण्यास निरु त्साह दाखिवल्याने हा प्रकल्प बंद पडला होता.दापचारी दुग्ध प्रकल्प बंद पडल्या नंतर सरकारी विभाग व खाजगी संस्थांना जमिनीचे वाटप सुरू करून तेथे बंगले व रिसॉर्ट उभे राहण्याचे काम सन २०११ मध्ये सुरू करण्यात आल्या नंतर ह्या प्रकल्पाची जमीन मूळ मालकांना परत करावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा तलासरीचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार ?ड.चिंतामण वनगा ह्यांनी दिला होता.ह्या दुग्ध प्रकल्पासाठी १९६३-६४ मध्ये १ हजार ७४ कुटुंबा कडून सुमारे ६ हजार ८०० एकर कुळ विहवाटीच्या जमीनी संपादित करण्यात आल्या होत्या.मात्र हा प्रकल्प पूर्णत: फसल्यामुळे मूळ मालकांना जमिनी परत कराव्यात अशी मागणी खा.वनगा ह्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणां कडे केली होती. मात्र त्यावेळी आघाडी सरकारने ह्याची दखल न घेतल्याने दापचारी संघर्ष समतिीची स्थापना करण्यात आली होती.ह्या प्रकल्पातील ५२ एकर जमिनीवर आरटीओ चेकनाका उभा राहिला असून रबर बोर्ड, फलोद्यान, मत्स्यबीज केंद्र, आणि खाजगी शिक्षण क्षेत्राला जमिनीचे वाटप करण्यात आले होते. सरकारने दिलेल्या ८०० गोठ्याच्या युनिट ची परस्पर लाखो रु पयात विक्री केल्याच्या आरोप ही त्यावेळी खा. वनगा ह्यांनी केला होता. तेथील गाई, म्हशी, वासरांची लिलावात विक्र ी करण्यात आल्या नंतर मजुरांना हाताला कामच शिल्लक न राहिल्याने त्यांच्या सोबत अधिकारी, कर्मचारी बसून पगार खात असल्याने आमच्या तक्र ारीची योग्य दखल न घेतल्यास चेक नाक्याचे काम बंद पडण्याचा इशाराही त्यांनी आघाडी सरकारला दिला होता.डहाणू पर्यावरण दृष्ट््या संवेदनशीलनिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाºयाच्या अध्यक्षते खाली नेमलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने डहाणू तालुका पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे एमआयडीसीला जागा देताना त्यांची परवानगी घेण्यात आली आहे का? पुढे त्यामुळे अडचणी नकोअसा प्रश्न खासदार चिंतामण वनगा ह्यांनी उपस्थित केला. १९९६ पासून ह्या प्राधिकरणातील एकही सदस्य बदलण्यात आलेला नाही. मी लोकसभेत अनेक वेळा प्रश्न मांडून ही सरकार काही करत नसल्याची खंत खासदार वनगा ह्यांनी लोकमतला बोलून दाखविली. दरम्यान, या निर्णयामुळे पालघरचा खºया अर्थाने आर्थिक विकास होणार आहे.एमआयडीसीला प्रत्यार्पित केलेल्या क्षेत्र ग्रामीण भागात असल्याने रेडिरेकनर दाराच्या दुप्पट दर या जमिनीची किंमत ठरविताना ग्राह्य धरण्यात आले आहे. या किमतीतून मिळणारी रक्कम पदुम विभागाच्या खात्या अंतर्गत राबविण्यात येणाºया योजनासाठी प्राधान्य क्र माने उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले.