पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:31 AM2018-09-21T03:31:15+5:302018-09-21T03:31:32+5:30

नगर परिषदेच्या २० व्या वर्धापन दिनाचा सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाला विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा नगर परिषद कार्यालयात केक कापून, फुलांचे गुच्छ भेट देऊन औपरोधिक निषेध केला.

Mascara movement in the chapel, chopped cake at the office | पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक

पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक

Next

पालघर : या नगर परिषदेच्या २० व्या वर्धापन दिनाचा सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाला विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा नगर परिषद कार्यालयात केक कापून, फुलांचे गुच्छ भेट देऊन औपरोधिक निषेध केला.
पालघर नगरपरिषदेची स्थापना १८ सप्टेंबर १९९८ रोजी झाल्याने मंगळवारी १८ सप्टेंबर रोजी २० वा वर्धापन दिन साजरा करणे अपेक्षित होते. सत्ताधारी असलेली शिवसेना, विरोधक असलेले राष्ट्रवादी, काँग्रेस आदींनी हा वर्धापन दिन साजरा करणे आवश्यक असतांना असा कुठलाही कार्यक्रम ठरविण्यात न आल्याने नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी आपल्या काही कर्मचाऱ्यांसह डहाणू येथे भाजप चे नगराध्यक्ष भरत राजपूत ह्यांच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. तर नगराध्यक्ष हे वर्धापनदिन साजरा न होण्याचे खापर प्रशासनावर फोडून मोकळे झाले होते. लोकमतने १९ सप्टेंबर च्या अंकात ह्या बाबत वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करून मुख्याधिकाºयांच्या कार्यालयात केक कापून, मनसे मार्फत सन्मानपत्र देत अभिनव आंदोलन केले.
नगरपरिषद स्थापने पासून शिवसेना तर कधी कॉंग्रेस - राष्ट्रवादी ची सत्ता नगरपरिषदेवर राहिली आहे. तर २०१४ पासून नगरपरिषदवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या २० वर्षा पासून पालघर नगरपरिषद विकास कामांऐवजी भ्रष्टाचार, गैरव्यवहार यासाठी प्रसिद्ध राहिली आहे. आजवर नगरपरिषदेतील रस्त्याच्या कामांचे घोटाळे, कचरा-गटार सफाई घोटाळा, औषध फवारणीतील गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. नगरपरिषदेच्या विषयीचा राग मनात धुमसत असतांनाच तिच्या वर्धापनदिनाची आठवणही नगरपरिषदेला न राहिल्याने, शहरवासीयांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.
>ही असंवेदनशीलता
ढिम्म प्रशासन आणि असंवेदनशील नगरसेवक यांच्यामुळेच ही वेळ आल्याची प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी यावेळी व्यक्त केली. हे सर्व असंवेदनशील नगरसेवकामुळेच घडत असल्याचे सांगीत तालुकाध्यक्ष मंगेश घरत, सचिव दिनेश गवई,शहराध्यक्ष सुनील राऊत, गीता संखे,उदय माने,शैलेश हरमळकर, मिथुन चौधरी, रत्नदीप पाखरे, तुलसी जोशी, सौरभ संखे, नयन पाटील, तन्मय संख्ये, धनंजय झुंजारराव आदींनी नगरपरिषदे आंदोलन केले.

Web Title: Mascara movement in the chapel, chopped cake at the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.