शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:52 PM

नवऱ्याकडून टेंडरसाठी १० लाखांची मागणी; वडिलांची तक्रार

शहापूर / वासिंद : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वासिंद पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी तिचा नवरा अशोक सुखदेव भोईर यास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.वासिंदजवळील साने गावातील करुणा अशोक भोईर या महिलेने १५ जुलै रोजी विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील गोवेली येथे राहत असलेले तिचे वडील सदा वामन चोरगे यांनी वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.त्यात माझ्या मुलीच्या आत्महत्येला तिचा नवरा अशोक सुखदेव भोईर, सासू बारकुबाई सुखदेव भोईर आणि सासरा सुखदेव कथोड भोईर ही सासरची मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.अशोक हा पत्नी करुणा हिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. ग्रामपंचायतीकडून घेतलेल्या टेंडरसाठी १० लाख मागितले होते. त्यापैकी तीन लाख तिने माहेरून आणून दिले. उर्वरित पैशांसाठी तिच्यामागे वारंवार तगादा लावला जात होता.> पैसे न आणल्यास घरातून हाकलू तसेच जीवे मारण्याची धमकी देत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता, असेही तक्रारीत म्हटले आहे.> याप्रकरणी वासिंद पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ भांगरे करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याVasai Virarवसई विरार