शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

विक्रमगड शहरातील बाजारपेठ ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:53 PM

व्यापारी असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत सर्वानुमते घेतला निर्णय : एक दिवस पुरेल इतकी लस उपलब्ध 

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरासह ग्रामीण भागात नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. तसेच बाजारपेठेत गर्दी केली जात असल्याने गावागावांत कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विक्रमगड व्यापारी असोसिएशनने तातडीची बैठक घेऊन ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन पाळत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे.विक्रमगड तालुक्यात एकूण १७० रुग्ण असून त्यापैकी ६५ रुग्ण नगरपंचायत हद्दीतील आहेत. शीळ येथे कमी प्रमाणात लक्षणे असलेले ३२ रुग्ण तर रिवेरा सेंटरमध्ये २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ९२ जण ऑक्सिजन रुग्ण आहेत. सद्य:स्थितीत मलवाडा, कुंर्झे व तलवाडा येथे लस देण्याचे काम चालू आहे, मात्र कोरोना व्हॅक्सिनचा साठा संपत आला असून एक दिवस पुरेल इतकी लस उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्याची मोठी गरज निर्माण झाली असून त्याप्रमाणे उपाययोजना केली जात असली तरी अनेक जण बेफिकीरपणे वावरत आहेत. चेहऱ्यावर मास्क नसणे, काम नसताना फिरणे, गर्दी करणे असे प्रकार दिसून येत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासन व नगरपंचायतीने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

शीळ येथील सेंटरमध्ये ३२ रुग्ण दाखल असून अजून ३५ रुग्णांना जागा उपलब्ध होऊ शकते. सद्य:स्थितीत मलवाडा, कुंर्झे व तलवाडा येथे लस देण्याचे काम चालू असून एक दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे.- डॉ. श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, विक्रमगड

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विक्रमगड व्यापारी असोसिएशनने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.- श्रीधर गालिपेल्ली, प्रभारी मुख्याधिकारी व तहसीलदार, विक्रमगड